Namo Shetkari Hapta News | 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली ती म्हणजे नमो शेतकरी( Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) महा सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होत आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम ( Pm Kisan) किसान योजनेच्या धर्तीवर ती राबवली आहे. जसे पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळतात. तसे राज्य सरकारच्या या योजनेमधून देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात, म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतात. चार महिन्याच्या वरचा काल उलटला असला तरी शेतकऱ्यांना अजून नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नाहीत व हे पैसे कधी मिळणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Namo Shetkari Hapta News
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता मिळाला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांना आतुरता लागलेले आहेत. शेतकऱ्यांमधून ही योजना बंद झाली आहे का या योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता (Namo Shetkari Yojana installment date)
महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना व जी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक स्त्रोत बनली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली गरज भासण्यास मदत होते. राज्य आणि केंद्र सरकारच्या या स्वतंत्र योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात.
मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना या योजनेमध्ये आपण तीन हजार रुपये वाढ करणार आहोत. वार्षिक शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देण्याचे ध्येय सरकारचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांना कधी हप्ता मिळणार अशी प्रश्न उपस्थित केला आहे. असता सरकार लवकरच त्यावरती निर्णय घेणार आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.
तसेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सरकारने अद्याप या हप्त्याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकऱ्यांना दर चार महिन्यांना दोन हजार रुपये दिले जातात. परंतु मागील वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांना 10 मार्च 2025 नंतर पेमेंट मिळणे अपेक्षित आहे परंतु अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही.
शेतकऱ्यांना खरंच वाढीव रक्कम मिळणार का?
निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती व मध्यंतरी झालेल्या भाषणांतरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या घोषणामध्ये कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर योजनेची वार्षिक पेमेंट आता सहा हजार रुपये वरून नऊ हजार रुपये वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे ₹2000 हजार रुपये मिळणार? आली मोठी अपडेट समोर
परंतु शेतकऱ्यांना अद्याप हप्ता मिळाला नाही, त्यामुळे वाढीव रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. सरकार या बाबतीत कधी निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. नुसती घोषणा कागदापूर्ती मर्याद राहणार का व त्याचा लाभ शेतकऱ्यांना खरोखर मिळणार आता याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. व यापुढे देखील नमो शेतकरी योजनेचे अपडेट साठी आणि ताज्या घडामोडीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. व याबाबत तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा!