Namo Shetkari Hapta: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, GR प्रसिद्ध

Namo Shetkari Hapta | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे. शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तरी बातमी नक्की वाचा कारण तुमच्या खात्यावरती काही दिवसातच दोन हजार रुपये जमा होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून सव्वा हप्त्याची रक्कम लवकर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यापूर्वी ही बातमी वाचणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. Namo Shetkari Hapta

नमो शेतकरी योजना

राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य सरकारने 2023-24 या कालावधीमध्ये नमो शेतकरी योजना जाहीर केली, ही योजना पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाने पाच हजार रुपये रक्कम जमा केलेले आहे. लवकरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत. यासाठी राज्य सरकारने 1642 कोटी रुपयांच्या निधी ला मंजूर दिलेले आहे अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे, लवकर त्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपये जमा होणार आहे. कृषी विभागाने मान्यता दिलेल्या सोळाशे 42 कोटी रुपये आणि विभागाकडे यापूर्वी शिल्लक असलेले 653 कोटी रुपये यांचा वापर केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महा सन्मान निधीचा सव्वा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी 1620 कोटी रुपयांच्या शासन मान्यता निधीला मंजुरी दिलेली आहे.

हि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महत्त्वाची आणि आर्थिक स्रोत निर्माण करणारे योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा झालेले आहे. तरी यापुढे देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शासनाने निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून शेतकऱ्यांना लवकरच दोन हजार रुपये मिळणार आहे.

परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या लाभांमध्ये वाढ करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु हा लाभ वाढणार का याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे. शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार का ? तीन हजार रुपये मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे.

मुख्यमंत्र्याच्या आश्वासन

मध्यंतरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती घोषणा केली होती की, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करू तर लवकरच या योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. परंतु ही वाढ कधी होणार याबाबत कोणतीही तारीख अधिकत माहिती दिली नव्हती. तर आता हा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. व या पुढच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक माहिती लवकरात लवकर मिळेल.

Leave a Comment

error: Content is protected !!