Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? पहा सविस्तर माहिती


Namo Kisan Hapta : शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधार बनत आहे यामुळे शेतकऱ्यांना शेती निगडित कामांमध्ये या पैशांचा उपयोग होत आहे. केंद्र सरकारकडून दिले जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि राज्य सरकारकडून याची योजनेच्या आधारावरती बनवलेली नमो शेतकरी योजना या दोन्हीचे हप्त ते एकत्रितपणे दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये केंद्राकडून आणि सहा हजार रुपये राज्य शासनाकडून सहा हजार रुपये मिळतात ही मदत शेतकऱ्यांना वर्षासाठी 12 हजार रुपयांचे आहे. अनेकांना आता उत्सुकता आहे की 2025 चा पुढील हप्ता कधी मिळणार? त्याबाबत सरकारकडून मोठी माहिती समोर आलेली आहे. Namo Kisan Hapta

9 मे 2025 पर्यंत राज्यातील एकूण 123.78 लाख शेतकऱ्यांनी PM किसान योजनेसाठी नोंदणी केले आहे. तर त्यातील तब्बल 118.59 लाख शेतकऱ्यांना एक ते 19 हप्त्यापर्यंत एकूण 35,586,25 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळालेला आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता दिला जातो आणि जून महिन्यात येईपर्यंत जुलै या कालावधीसाठी 20वा हप्ता दिला जाणार आहे.

या हप्त्यासाठी लाभार्थ्यांनी eKYC आणि आधार लिंक व जमील पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. कितीनी बंधनकारक बाबी पूर्ण असतील तरच हप्ता खात्यावरती जमा होणार आहे. त्यांना जून 2025 मध्ये थेट बँक खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता मिळेल अशी माहिती प्रसार माध्यमांवर ती झळकू लागलेली आहे.

तर दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील याचा आधारावरती शेतकऱ्यांना दिला जाणार आहे म्हणजे 9 मे 2025 च्या अखेरीस या योजनेत 93.9 लाख शेतकरी लाभार्थी आहेत आणि त्यांना एकूण 11,130.45 कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहेत. यातील 1 ते 6 हप्ता दिले गेले असून आता सातवा हप्ता देखील जून महिन्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे हा हप्ता पी एम किसान योजनेच्या फक्त सोबत मिळू शकतो.

म्हणजेच ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे एकाच वेळी हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक लाभ होऊ शकतो व त्यांना पुढील शेतातील कामासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो.

जर तुमच्या खाते अद्याप अपडेट केले नसेल आधार कार्ड लिंक नसेल किंवा जमीन दस्तावेज अडचणीत असेल, तर पुढील आता थांबू शकतो त्यामुळे लवकरात लवकर कामे पूर्ण करून आपली पात्रता पूर्ण करा.

हे पण वाचा | Namo Shetkari Hapta: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, GR प्रसिद्ध

1 thought on “Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!