लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! योजनेमध्ये नवीन नियम लागू?

Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन मोठा बदल केलेला आहे. यामुळे राज्यातील अनेक महिला अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. या नवीन नियमानुसार कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत याची माहिती आपण जाणून घेऊया. Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana

या नवीन नियमांमध्ये जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे अनेक महिलांना या योजनेमधून वगळले जाणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर महिलांचे नावे किंवा कुटुंबाची नावे ट्रॅक्टर असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर इतर कोणतीही चारचाकी वाहन असल्यास या योजनेतील लाभ मिळणार नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे.

नव्या नियमानुसार अर्ज होणार बाद!

प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सरकार या योजनेच्या नियमामध्ये बदल करत आहे. चार चाकी वाहनाच्या निकषाचा समावेश केला जात आहे. याआधी निकषांमध्ये वार्षिक उत्पन्न व आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवले जात होते. मात्र, आता कुटुंबाच्या नावावर चार चाकी वाहन असले तर महिला पात्र ठरणार आहे.

हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती

लाडकी बहीण योजनेच्या पत्रिकेचे निकष

  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक.
  • महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  • घरातील कोणता व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असल्यास लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबाच्या नावावरती चार चाकी वाहन असल्यास महिला अपात्र ठरणार आहे.

विरोधकांचा सरकार वरती हल्लाबोल

या नवीन निर्णयामुळे विविध पक्षांनी सरकार वरती मोठा हल्लाबोल केलेला आहे. विरोधी पक्षांनी सरकारला धारेवरती धरलेले आहे. चार चाकी वाहन असणे म्हणजे आर्थिक स्थिती असणे असे होत नाही. असे त्यांनी सांगितले आहे.

काही महिलांनी अनेक वर्षांपूर्वी गाडी खरेदी केली असेल, पण त्यांचे आर्थिक परिस्थिती आता बदललेली असेल. तर काही घरांमध्ये केवळ लाख 2 लाखांची जुन्या मॉडेलची गाडी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योजनेमधून अपात्र ठरवणार का? असं प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये नाराजी ?

सध्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे जुन्यात चार चाकी वाहने आहेत यामुळे दैनंदिन प्रवासासाठी किंवा शेतीसाठी अनेक गाड्या उपयोगी पडतात. मात्र, सरकार या निर्णयामुळे गरजू महिलांना या योजने पासून वंचित राहण्याची शक्यता वर्तमात येत आहे.

ग्रामीण भागामध्ये महागड्या गाड्या दुचाकी नाही, पण चार चाकी वाहन आहेत जुन्या आहेत आणि हा निर्णय अन्यायकारक आहे. असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आहे.

नवीन निर्णयाचा पुनर्विचार होणार ?

राज्यामध्ये लवकरच आता स्वराज्य संस्थेचे निवडणूक लागणार आहे. महिलांमध्ये वाढणाऱ्या नाराजी मुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागू शकते. परंतु सरकार यावरती पुनर्विचार करणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे आणि महिलांचे संघटन सरकारवर दबाव टाकत असल्याचे देखील समोर येत आहे.

सरकारचा बचाव – गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न

सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत असताना सांगितले की, योजनेचा लाभ खरोखर गरजू महिलांपर्यंत पोहोचावा म्हणून हे नवीन निकष लागू करण्यात आलेले आहेत. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या कुटुंबांमध्ये चार चाकी वाहन असते, त्यामुळे गरजू महिलांसाठी निधी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.

1 thought on “लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! योजनेमध्ये नवीन नियम लागू?”

Leave a Comment

error: Content is protected !!