Monsoon Update : राज्यात ढगफुटी सारखा पाऊस होणार! हवामान खात्याचा इशारा!


Monsoon Update : राज्यात मान्सून पूर्व वाऱ्यांनी आणि विजांच्या कडकडाटासह दमदार एंट्री घेतली आहे. मुंबईपासून गडचिरोली पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढच्या आठवड्यात थेट ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली. म्हणजे नेहमीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रावर पोहोचणार हे नक्की आहे. Monsoon Update

यंदा खरंतर मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. हा मान्सूनचा पाऊस नाहीये पण लक्षात घ्या. अवकाळी पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात काही भागात ढग फुटी सारखे दृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. आज पार्श्वभूमीवरती पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. ढगफुटी झाल्यास मागच्या वर्षी सारखी परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे.

कोणत्या तारखांना, कुठे पाऊस धडकणार?

21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासोबत 50 किमी प्रति तास वेगाने सोसायटीचे वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

हे पण वाचा | Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!

ऑरेंज अलर्ट मध्ये कोणते जिल्हे?

हवामान खात्याचा अपडेट नुसार, पालघर आणि मुंबई वगळता संपूर्ण कोकण- म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे इथं मंगळवार पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी आहे. तसंच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यात येलो अलर्ट दिला गेला आहे. पावसाचा जोर अचानक वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, आणि उस्मानाबाद या भागात सोसायट्यांचा वाऱ्यांसह वळवाचा जोर जाणवणार आहे.

मान्सून लवकर महाराष्ट्रात धडकणार!

हवामान खात्याने स्पष्ट केलं की, यंदा केरळ सोबतच महाराष्ट्रात ही मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. निवृत्ती मान्सूनचा प्रवास अधिक वेगात सुरू असून, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात ही वाऱ्यांची दिशा बदलली. याचा थेट परिणाम म्हणजे आपल्याकडे पावसाचा जोर वेळीच जाणवतोय.

पुढचे पाच दिवस सावध!

देशभरात उकड्याच्या दरम्यान विजांचा आवाज आणि वळव्याचा तडाका जाणवतोय. उत्तर भारतात हरियाणा, पंजाब, दिल्ली, बिहार, झारखंड, ओडिसा इथही अवकाळी पावसाचा वातावरण निर्माण झाले. त्यामुळे महाराष्ट्रात ही पुढचा आठवडा धोक्याच ठरू शकतो. कुठेही बाहेर पडताना हा मन विभागाच्या सूचना लक्षात ठेवावे आणि अतिवृष्टीसाठी सज्ज राहावे.

Leave a Comment

error: Content is protected !!