Monsoon Update : राज्यात मे महिन्यात पावसाने हजेरी लावली खरी, परंतु आता महाराष्ट्रातून अचानक पाऊस गायब झालेला आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या करून ठेवल्यात आणि पावसाने विलंब लावला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही त्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये थोडीशी वाट पाहावी. एकाद्या शेतकऱ्यांनी पेरणी केली म्हणून आपणही करायची असं करू नका. हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून पेरणी करावी. Monsoon Update
भारतीय हवामान खात्याने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामान अंदाज मध्ये वर्तुत होते की अर्जुन पासून पावसाला सुरुवात होणार परंतु अद्याप पावसाला कुठेही सुरुवात झालेली नाही व पावसाचा ठाव ठिकाणा नाही. शेतकरी असो वा सर्वसामान्य माणूस प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रश्न घोळतोय, “मान्सून नक्की केव्हा येणार?”
गेल्या काही दिवसांपासून मान्सून थांबलेला आहे. 29 मे रोजी जिथपर्यंत मान्सून पोहोचला, तिथेच तोच थांबलेला आहे. तो पुढे सरकलाच नाही, यामागचे काही कारण हवेतून येणारा कोरडा प्रवाह. नैऋत्य दिशेने पुढे सरकणाऱ्या मान्सूनचा प्रभाव थांबते. असा हा मन तज्ञांचा दावा आहे. आता नवीन अंदाजानुसार 12 ते 18 जून या दरम्यान पावसाला सुरुवात होईल असं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | राज्यात मूळ मान्सूनचा पाऊस या तारखेपासून सुरू होणार! जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अंदाज…
राज्यात नाही, देशभरामध्ये उन्हाचा कहर
देशाच्या उत्तर भागातून समितीची लाट्याचा इशारा दिलेला आहे. दिल्लीमध्ये शनिवारी तापमान तब्बल 40°c च्या आसपास पोहोचला. पुढील काही दिवसांमध्ये तापमान तीन ते चार अंशाने वाढणारा असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश अशाप्रकारे अनेक भागांमध्ये उष्णतेचा लाटेचा धोका आहे. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणतात की, पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा असणार आहे.
शेतकऱ्यांना काळजी लावणारे दिवस सुरू
सध्याच्या वातावरणातला बदल पाहता शेतकऱ्यांचा संपूर्ण गणित बिघडलेला आहे. एप्रिल महिन्यापासून तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा एक धाकात बसला आहे. पावसाने एप्रिल महिन्यात हजेरी लावली खरी, परंतु आता पेरणीच्या वेळीच पावसाने दांडी मारली आहे. बियाणा, खत, ट्रॅक्टर भाड, मजूर सगळे बुकिंग केलं होतं. पण आता पावसाच्या विलंबामुळे सगळी मेहनत रखडले आहे. आधी वळवाच्या पावसाने काही जणांनी पेरण्या सुरू केल्या, पण आता शंकेचा डोंगर उभा राहिलेला आहे. “खरं मान्सून अजून आलाच नाही, तर पेरणीची बियाण वाया जातील का?”