शेतकऱ्यांनो, या तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात सुरू होणार मुसळधार पाऊस! वाचा नवीन अंदाज


Monsoon Update | राज्यात पावसाचे चित्र पाहायचं झाल्यास सध्या पावसाने थोडेसे विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाला आहे. मराठवाड्यातून तर पावसाने यामध्ये दांडी मारली आहे यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढत चाललेली आहे परंतु शेतकऱ्यांना चिंता नको हवामान खात्याने पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवलेला आहे यामध्ये राज्यात सहा जुलैपासून पावसाला चांगल्या प्रकारची सुरुवात होणार असं म्हटले आहे. Monsoon Update

हवामान विभागाच्या अंदाजामध्ये स्पष्ट माहिती देण्यात आली आहे की सहा जुलैपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. सध्या पुणे, कोकण, कोल्हापूर आणि नाशिक परिसरात जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

पुणे शहर सह खडकवासला धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाने 6451 क्यूसेसचा पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणात मधून 2133 क्यूसेसचा निसर्ग सुरू झाला आहे पुणे पिंपरी चिंचवड, मावळ परिसरातील धरणे भरून लागल्यामुळे पाणी टंचाईच्या भीतीवर काही प्रमाणात दीलासा मिळाला आहे.

हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ K.S होसाळीकर यांनी सांगितल्यानुसार, 6 जुलै पासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. या मुसळधार पावसामुळे घाटमाथावरून वाहणाऱ्या नद्यांचा विसर्ग वाढेल.

तसेच, मराठवाडा आणि विदर्भात ही पावसाचा जोर वाढणार असून, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. सध्या विदर्भ मध्ये हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे कोल्हापूर सातारा नाशिक सह कोकणातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे मात्र खरी माझ्या ६ जुलै नंतर सुरु होणार असून पावसाची दरवाजे संपूर्ण राज्यासाठी उघडले येणार आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी तयारीत राहणे गरजेच आहे.

हे पण वाचा | 26 जूननंतर या जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस! जाणून घ्या पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज…

Leave a Comment

error: Content is protected !!