Monsoon Update 2025 : राज्यात उखाडा वाढत असताना पावसाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. यंदा मान्सून वेळ आधीच भारतात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. विशेषता अंदमान निकोबार बेटावर लवकरच मान्सूनपूर्व पावसाळी स्थिती निर्माण होणार असून, यामुळे केरळमध्ये एक जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे आठ जूनच्या सुमारास पावसाचा आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Monsoon Update 2025
गेला काही दिवसांपासून राज्यात काही भागात मेगा गर्जना सहकारी पाऊस होत असल्याने हवामानात बदल जाणून लागलेला आहे. राज्यामध्ये पावसाचे तापमान पाहायला मिळत आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कोणाच्या उष्णतेपासून त्रस्त असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमी वरती हवामान विभागाकडून काही मान्सूनपूर्व माहिती मिळाली आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, यंदा देशामध्ये सरासरी 105% इतका पाऊस होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एल निनो चा सकारात्मक परिणाम यंदा जाणवणार नाही. त्यामुळे पावसासाठी वातावरण अतिशय अनुकूल आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकणं अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
यावेळी महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे पावसावर अवलंबून असलेलं खरीप हंगामासाठी हे संकेत अत्यंत शुभ मान्य जात आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीची मतसागतीचा वेग वाढवावा जेणेकरून त्यांना या मान्सूनचा फायदा होईल. मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरी इतकाच पाऊस होण्याची शक्यता आहे असं तज्ञांचे म्हणणं आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने नुकताच एक अलर्ट जारी केलेला आहे. पहिला दोन दिवसापासून पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील चार दिवसासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
सर्व घडामोडी पाहता, यंदा मान्सून वेळेआधी महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर शेतीची मशागत करून आपली शेती तयार करून ठेवणे आवश्यक आहे. वेळेवर पेरणीची तयारी करावी आणि सामान्य नागरिकांनी हवामान अपडेट्स दररोज पाहून आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आवश्यक बदल करावे असे सूचना तज्ञांकडून देण्यात आलेले आहेत. यंदा लवकर येणारा पाऊस आनंदही असणार आहे तसा असतो योग्य नियोजनाशिवाय त्रासदायक देखील ठरू शकतो. त्यामुळे काळजी घ्या आणि तयारी या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मागच्या वर्षी अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मानसून येण्यापूर्वी आपण सर्वांनी शासनाने योग्य तयारी करणे गरजेचे आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रावरती अवकाळीच मोठा संकट! हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला विशेष इशारा