शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! मान्सून पुढे सरकला, या तारखेला होते महाराष्ट्रात दाखल


Monsoon Update : यावर्षी पावसाला घाई लागलेली बहुतेक हवामान खात्याचा अंदाजानुसार, यंदा मान्सून सहा दिवस आधीच म्हणजे नियोजित वेळेच्या आधीच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांना आधीच हैराण केले आहे आणि पळू का सळू केला आहे. कोकण आणि मुंबईच्या काही भागात ढगांनी घेरल, आणि आकाशामध्ये ठिणग्या पडायला सुरुवात झालेली आहे सगळं काही मान्सूनच्या आगमनाचे संकेत देत आहेत. Monsoon Update

21 मे रोजी अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. हा पट्टा थेट महाराष्ट्राच्या समुद्रकिनाराला धक्का देणार नाही, पण त्याचा परिणाम मात्र किनारपट्टीवरती जाणवणार आहे. आय एम डी न दिलेल्या माहितीनुसार 24 मे पर्यंत हा दबाव आणखी तीव्र होणार आणि त्यामुळे समुद्राचे स्वरूप अधिक खवळलेले दिसेल.

२१ ते २४ मे या चार दिवसांमध्ये रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. किनाऱ्याला लागून असलेल्या भागांमध्ये पाऊस आणि वाऱ्यांचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी पर्यटकांची विशेष काळजी घ्यावी अशी आव्हान हवामान खाते ना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेले आहे.

मासेमारी बांधवांसाठी इशारा!

या काळामध्ये म्हणजेच 21 ते 24 दरम्यान, समुद्रातील स्थिती काहीशी धोकादायक होणार आहे. 21 व 22 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड च्या जवळ समुद्र खवळलेला असेल. 23 व 24 मेला मुंबई, पालघर, रत्नागिरी या परिसरामध्ये खोल समुद्रात जोरदर वाऱ्यांचा फटका बसू शकतो. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणा टाळाव असं स्पष्टपणे हवामान खात्याने सांगितलेला आहे.

तर कोणताही धोका पत करू नका आपली बोटी, जाळ, आणि जीव सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळे समुद्र थोडा शांत होईपर्यंत थांबा, हवामान खात्याच्या सूचना ऐका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिले जाणाऱ्या आरोग्य कडे लक्ष द्या.

शेतकऱ्यांसाठी दिलासा! तयारीला लागा

यावर्षी परिस्थिती काही वेगळीच पाहायला मिळत आहे परंतु शेतकऱ्यांसाठी एक दिलासादा एक बातमी आहे. ती म्हणजे मान्सून यावर्षी सहा दिवस आधीच राज्यामध्ये दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अपडेट नुसार 25 ते 27 मे दरम्यान मान्सून केरळात पोहोचेल आणि लगेच मुंबई कोकणात दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आता खरीपासाठी मशागत, बियाणं, खत सगळ्याची तयारी जोमात करा. पाऊस हळूहळू सरकतच आहे.

हे पण Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!वाचा |

Leave a Comment

error: Content is protected !!