Monsoon Update: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे उष्णतेने कंटाळलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील ही बातमी अतिशय महत्त्वाची ठरू शकते. मान्सून सुरू होण्याअगोदर शेतीची सर्व मशागत पूर्ण करून शेती खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयार करून ठेवणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. राज्यात मान्सून दाखल होण्याअगोदर पुढील पेरणीसाठी शेती पूर्णपणे तयार करावी लागते. IMD चा रिपोर्ट नुसार, मान्सून 13 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटावर दाखल होणार आहे आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसात केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून पाच ते सात जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरवर्षी मान्सून साधारणपणे 9 ते 11 जून च्या दरम्यान राज्यात दाखल होत असतो. पण यंदा मान्सूनचे आगमन दक्षिण कोकणात 5 जून पासून आणि मुंबई पुण्यात सात ते आठ जून पर्यंत होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. यंदा एन मिनू चा प्रभाव नसल्याने पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरी 105 टक्के पर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या वेळेवर पेरणी करण्याची संधी मिळेल आणि उत्पादनात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. गेल्या 50 दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. मात्र 13 मे पासून मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपिट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे. दरम्यान पावसासोबत वादळी वारा आणि विजेचा कडकडाट देखील होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान सर्वात मोठी बातमी हीच आहे की यावर्षी मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर यावर्षीच्या मान्सून मध्ये शेतकऱ्यांच्या मनासारखा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Monsoon Update
3 thoughts on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावर्षी महाराष्ट्रात मान्सून या तारखेपासून सुरू होणार…”