Monsoon Rain : राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळीच सत्र सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठा हताश झालेला आहे. अशातच एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे 2025 चा मान्सून हा कधी दाखल होणार? याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागत असती, परंतु यावेळी वाट पाहत बसण्याची गरज नाही मान्सून वेळेवर राज्यात दाखल होणार आहे. Monsoon
दरम्यान अंदमान निकोबार बेटावर नैऋत्य मोसमी पावसाने दस्तक दिली आहे आणि पुढील टप्प्यात महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार यावरती पुणे वेधशाळेने एक मोठा अंदाज व्यक्त केलेला आहे.
आज मुंबईत आणि ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे. दक्षिण कोकणातील हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. घाटमातेचे कोल्हापूर सातारा, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !
शेतकऱ्यांसाठी व राज्यातील पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा राज्यात मान्सून हा 6 जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू उत्तर दिशेने सरकत महाराष्ट्रात प्रवेश करेल. यावेळी पूर्व मान्सून स्वरूपात राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या पाच दिवसात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही वेधशाळेने वर्तवला आहे.
यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 105% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या पार्श्वभूमी वरती मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आधी पाऊस पडेल असा अंदाज आहे. शेतकऱ्यांसाठी बातमी अत्यंत दिलासा ठेवणार आहे कारण यंदाचा पावसाळा उत्पादन वाढवण्यास मदत करणार आहे आणि वेळेवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील वाढणार आहे.
मान्सून सध्या अंदमान आणि निकोबार बेटावर जोरदार हजेरी लावत आहे. त्या भागातील मागील 24 तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान समुद्र, मालदीव आणि कोमोरिन परिसरामध्ये मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भंडारा-गोंदिया, गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बुधवारी 14 ते गुरुवारी 15 मे साठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारा देण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी सतर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा |शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या तारखेला दाखल होणार महाराष्ट्रात मान्सून, वाचा सविस्तर माहिती