MI vs CSK | काल आयपीएल 2025 हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगला होता. या सामान्य दरम्यान काही नवीन खेळाडूंनी विशेष कामगिरी करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा एक नवखा खेळाडू असून आपल्या कामगिरीने सर्वांचे मन जिंकले आहे. हा खेळाडू मुंबई इंडियन्सचा आहे. चेन्नई सुपर किंग्स ने मुंबई इंडियन्सला सहज पराभूत केले असले तरी पण मुंबईच्या या नवीन गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच जबरदस्त प्रदर्शन करून दाखवले. MI vs CSK
विघ्नेश पुरुर या खेळाडूचे नाव आहे, विशेषतः खेळाडू गरीब कुटुंबातून येत असून मुंबई इंडियन्सने याला संधी दिली असल्याने मुंबई इंडियन्सला देखील सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया वरती चांगले प्रमाणे फेम मिळत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळवणारा आणि पहिल्याच सामन्यात प्रभाव टाकणारा खेळाडू म्हणजे विघ्नेश पुतुर केरळ मधील एका गरीब कुटुंबातून आलेला खेळाडू आहे. हा खेळ त्याच्या स्वतःच्या जीवावरती इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवतात आणि घरचा उदरनिर्वाह त्यांच्यावर अवलंबून आहे.
जबरदस्त गोलंदाजी
मुंबई इंडियन्सने विघ्नेश ला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिलेली आहे आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी तीन ओव्हर मध्ये तीन विकेट काढत चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, दीपक हुडा, या नामांकित प्लेअरची विकेट त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी त्याच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये यांना अडकवले.
मुंबई इंडियन्स ने किती रुपयांनी खरेदी केले
विघ्नेश केरळ कडून अंडर-14 व अंडर 19 क्रिकेट खेळला आहे. त्याला वरिष्ठ संगामध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, त्याच्या कौशल्याची दखल घेत मुंबई इंडियन्स न त्याला IPL 2025 च्या लिलावामध्ये तीस लाख रुपयांना विकत घेतलेले आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने त्याला दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीग संघ MI केपटाउन सोबत प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं.
विघ्नेश सुरुवातीला वेगवान गोलंदाज होता, परंतु मोहम्मद शेरीफ या प्रतीक्षाने त्याला फिरकी गोलंदाज होण्यास सल्ला दिला. त्यानंतर त्याने त्रिशूल येथे प्रशिक्षण घेतले आणि विविध स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत राहिला. त्याच्या महिने तिला फळ मिळाले आणि आता तो आयपीएल मध्ये चमकत आहे.
( अशा नवीन अभ्यास साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून लवकरात लवकर अपडेट मिळेल.)
हे पण वाचा | DC VS LSG Preview IPL 2025 | Delhi Capitals VS Lucknow Super Giants जोरदार लढत, कोण मारणार बाजी पहा