लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…

Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी त्या महिलांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक हप्त्याबाबत एक मोठी चर्चा सुरू आहे. ज्यामुळे अनेक महिलांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत मे महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाल्यापासून महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये म्हणजेच दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळतो. आतापर्यंत या योजनेचे एकूण 11 हप्ते पात्र बैलाच्या खात्यात जमा झाले आहेत. यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या महिन्यांचा समावेश आहे. मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

हे पण वाचा|शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुधारित पिक विमा योजना सुरू; जाणून घ्या काय होणार फायदा?

जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित?

सध्या जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजून जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. याच कारणामुळे एक नवीन चर्चा सध्या सुरू झाली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यामध्ये थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. जर दोन्ही महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले तर महिलांना एकत्रित तीन हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो.

हे पण वाचा|सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे 10 ग्राम सोन्याचे दर

ही बातमी ऐकून राज्यातील अनेक महिलांना दोन महिन्याचा लाभ एकत्रित मिळणार का असा प्रश्न पडला आहे. पण यापूर्वी देखील या योजनेअंतर्गत दोन महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर यावेळीही असे घडले तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. अशा परिस्थितीत बारावा आणि तेरावा हे दोन्ही हप्ते जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आलेली नाही. Mazi Ladki Bahin Yojana

प्रसार माध्यमांमध्ये दोन हप्त्याचे पैसे एकत्रित मिळण्याचा चर्चा जोरात सुरू असल्या तरी यासंदर्भात अजून तरी कोणतेही अधिकृत माहिती हाती लागलेली नाही. यामुळे खरंच या योजनेचे दोन हप्ते एकत्रित जुलै महिन्यात जमा होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सरकारने यावर लवकरच स्पष्टता आणावी अशी अपेक्षा लाभार्थी महिलांना आहे. याबाबत कोणतीही नवीन अपडेट आल्यास, आम्ही तुम्हाला त्वरित कळवू तोपर्यंत या चर्चेमुळे लाभार्थी महिलांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कारण दुहेरी हप्ता मिळाल्यानंतर महिलांना एकत्रित तीन हजार रुपयाची आर्थिक पाठबळ मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…”

Leave a Comment

error: Content is protected !!