Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राज्यात सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेत राज्य सरकारने आता निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत निकषात न बसणाऱ्या 19 लाखापेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे अनेक महिलांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागले आहेत. राज्यातील लाखो महिला आर्थिकदृष्ट्या प्रबळ तयार झाल्या आहेत.
आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा पडताळणी सुरू केली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी सुरू केली असून, त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. त्यामध्ये आता अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत व आणखीन अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹1500 रुपये नाहीतर, डायरेक्ट ₹3000 रुपये जमा होणार! वाचा सविस्तर माहिती
पडताळणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाची मदत..
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिलांना वगळण्यासाठी सरकारी पडताळणीवर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारी नोकरी शासकीय महामंडळ आणि निमसरकारी नोकरी करत असणाऱ्या लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर आता ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली आहे. ही पडताळणी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाची मदत घेतली जाणार आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबातील पुरुष आयटी रिटर्न भरत असेल किंवा त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या योजनेतून 19 लाख महिलांना अपात्र ठरवलं गेले आहे. दरम्यान पडताळणी सुरू असून या योजनेतून आणखीन काही महिला अपात्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषा बाहेरून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती समोर आल्यानंतर या योजनेची पडताळणी सुरू करण्यात आली. दरम्यान अनेक निकषानुसार अनेक महिला या योजनेतून अपात्र झाल्या, मात्र अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची पडताळणी झाली नव्हती. आता त्या महिलांचे पडताळणी करून त्या महिलांना या योजनेतून बाहेर काढले जात आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11 वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती
लाडकी बहीण योजनेची पडताळणी होत असताना विरोधकांनी सरकारच्या या पडताळणीला जोरदार टीका केली आहे. महिलांना सरसकट या योजनेचा लाभ द्या. जनतेच्या पैशाची लूट होऊ देणाऱ्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेला कात्री लावणं म्हणजे सरकारने स्वतःसाठी खड्डा खोदल्यासारखा असल्याचा टोला विरोधकाकडून लावला जात आहे. या योजनेवरून सरकारला विरोधकाकडून जोरदार टीका होत आहे. मात्र या योजनेला सर्वसामान्य महिलांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे.
यापूर्वी देखील लाडकी बहीण योजनेच्या निकषाची कठोर चाळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण राजकीय कारणाने तो पुढे ढकलवण्यात आला. आता सरकारची मोठी आर्थिक ओढाताण होऊ लागल्यामुळे निधी वगळण्यावरून महायुती कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या काळात निकषात न बसणाऱ्या श्रीमंत महिलांना या योजनेतून काढून टाकले जाणार हे निश्चित आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना पुढचा हप्ता येणार का नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. Mazi Ladki Bahin Yojana
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेतून 19 लाखाहून अधिक महिला अपात्र; तुम्ही या सरकारी पडताळणीत आलात का?”