लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार मे महिन्याचा हप्ता; ₹1500 मिळणार का ₹2100?

Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणीच्य खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मे 2025 रोजी जमा झाला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला असल्याने आता मे महिन्याचा लाभ कधी मिळणार असा सवाल लाडकी बहिणींच्या वतीने उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे. त्यानंतर आता लगेच मे महिन्याच्या तबाबत उपस्थित होऊ लागला आहे. याचे कारण असे की अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे पैसे सोबत मिळणार अशी बातमी समोर आली होती. मात्र प्रत्यक्षात सरकारने एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या हप्ते एकत्रित दिले जाणार असल्याची कोणतीही माहिती दिली नाही. दोन मे रोजी फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला आहे. मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ एकत्रित देण्यात आला होता.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील या सात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा सविस्तर माहिती

8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सरकारने फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले होते. यामुळे एप्रिल आणि मी या दोन महिन्याचे पैसे देखील एकाच वेळी जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. अनेक मीडियाच्या माध्यमातून असाच दावा केला जात होता. सरकारने सध्याच्या स्थितीला फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आहे. यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता जसा लांबणीवर मिळाला आहे तसाच मे महिन्याचा हप्ता पण उशिरा मिळणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा लाभ लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट अनुसार या योजनेत मागील अनेक महिन्यापासून हप्त्याचे पैसे हे शेवटच्या आठवड्यात जमा होत आहेत. त्यामुळे या महिन्यात देखील लाडक्या बहिणींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा | SBI धारकांसाठी मोठी बातमी! बँकेची ही सेवा राहणार बंद! वाचा सविस्तर माहिती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांच लाभ दिला जात आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 अशा एकूण दहा महिन्याचा लाभ लाडक्या बहिणीच खात्यात जमा झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लवकरच ही रक्कम वाढवली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. Mazi Ladki Bahin Yojana

यामुळे या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आपणास सांगू इच्छितो की 2100 बाबत अजून शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे पुढील मे महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!