Marathwada Weather Forecast: मे महिना सुरू झाला आणि राज्यातील वातावरणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बदल पहायला मिळत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलेली आहे हवामान विभागाने राज्यात दुहेरी संकट निर्माण झाले असल्याने एक मोठा इशारा जाहीर केलेला आहे. एकीकडे वाढते तापमान तरीके कडे गारपीट आणि पाऊस अशा संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. Marathwada Weather Forecast
मे महिन्याच्या तोंडावरच उष्णतेने मराठवाड्याला अक्षरशा हैराण केला आहे. मराठवाड्यातील आठवी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40° च्या पुढे गेले असताना, आता दुपारनंतर आकाशात गडद ढग पाहायला मिळत आहेत. यात पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारायची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यामध्ये दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळु शकतात. याच पार्श्वभूमी वरती राज्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परंतु मराठवाड्यात पावसासाठी वातावरण तयार झाले असले तरी उष्णतेचा जोर अजूनही कमी होणार नाही असं हवामान खात्याने स्पष्ट केला आहे. अनेक भागात तापमान 43° वर पोहोचले असून उष्णताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर जान टाळावं, असा सल्ला देण्यात आलेला आहे.
उद्या आणि परवाच काय?
चार आणि पाच मे रोजी हवामान विभागाने थोडं हवामान अनिश्चित राहील. तसेच या पार्श्वभूमी वरती मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी पाडण्याची शक्यता असते विजांच्या कडकडाट आणि गारपीटीची संभाव्य धोका निर्माण झालेला आहे. तापमानात थोडीशी घट होईल पण उष्णतेचा दाह कमी होणार नाही.
पावसाच्या शक्यतेमुळे काही भागात खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. पण अचानक होणाऱ्या वाड्यांमुळे उभ्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन पुढील शेतीची पाऊल उचलावीत.
वयोवृद्ध, लहान मुला आणि आजारी व्यक्तींना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे दुपारच्या वेळेस घराबाहेर चांगला टाळावं. पुरेसं पाणी प्यावं, अनिल हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे, तसेच सूर्यापासून बचाव करण्याचे उपाययोजना कराव्यात.
हे पण वाचा | Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!