लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! मे महिन्याचा हप्त्या या दिवशी जमा होणार? वाचा सविस्तर


Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेची सुरुवात मागील वर्षाच्या जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तुम्हीही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला देखील दरमहा 1500 रुपये मिळत असतील तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्याच्या उद्देशाने ही योजना शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना आता मिळणार 40 हजार रुपये कर्ज; अजित पवारने केली मोठी घोषणा..

लाडकी बहीण योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 10 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे एकूण त्याचे पंधरा हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आले असून आता महिलांना पुढील आत्याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होईल? यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर मिळाली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. एप्रिल महिन्याचे पैसे दोन मे 2025 रोजी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. खरंतर मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे महिलांना एकत्रित मिळाले होते त्याचप्रमाणे मे महिन्यात देखील एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचे पैसे सोबत मिळतील असे अपेक्षा होती. मात्र एप्रिल महिन्याचे पैसे दोन मे ला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत पण मे महिन्याचे पैसे आणखीन देखील महिलांना मिळाले नाहीत.

हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर

यामुळे आता मे महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात आला असल्यामुळे आता मे महिन्याचा लाभ जून महिन्यात मिळणार की काय अशी शंका महिलांच्या मनात उपस्थित झाली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच जमा होऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण दहा हफ्ते देण्यात आले आहेत आणि बहुतांश हप्ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आले आहेत. मे महिन्याचा हप्ता देखील त्याचप्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अकरावा हप्ता देखील मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्सने वर्तवली आहे. मात्र अजूनही या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाही त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल हे पाहण्यासारखे राहील. दरम्यान येणाऱ्या फसव्या आणि चुकीच्या बातमीपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. Majhi Ladki Bahin Yojana

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! मे महिन्याचा हप्त्या या दिवशी जमा होणार? वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!