Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List: राज्यातील महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि या योजनेमध्ये अपात्र ठरत असाल तर ही बातमी नक्की वाचा. Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List
सध्या लाडकी बहिणी योजनेची सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमांवरती मोठी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी प्रमाणामध्ये घट झाल्याचे माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1.5 लाख महिलांनी या योजनेतून माघार घेतलेली आहे. काही महिलांनी स्वतःच्या इच्छेने योजना सोडलेली आहे. तर काहींना अपात्र ठरवण्यात आलेले आहे.
महिलांनी या योजनेमधून माघार का घेतली?
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू केलेली आहे त्यामुळे अपात्र होण्याच्या भीतीने महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत. तसेच काही महिलांच्या नावावरती चार चाकी वाहन आहे किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावरती वाहन आहे यामुळे देखील महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. तसेच काही महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत त्याचा समोर आलेला आहे अशा महिलांना वगळण्यात आलेले आहे. 1.10 लाख महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असल्याने अपात्र ठरवले गेले.
हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र
पत्र लाभार्थ्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही ?
राज्य सरकारने लडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट संकेत दिलेले आहेत. ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरलेले आहेत त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही. मात्र त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार सरकारच्या या निर्णयामुळे आणखी महिलांचे नावे या यादी मधून वगळले जाण्याची शक्यता सध्या प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.
महिलांसाठी ही योजना महत्त्वाची
महिलांसाठी राज्य सरकारने ही योजना राबवल्यामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या योजनेमध्ये आता पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्याने गरजू व मात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच पुढे येत्या काळामध्ये आणखी काही महिला या योजनेमधून अपात्र ठरणार असल्याचे संकेत सध्या वर्तवण्यात येत आहे.
( अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत लवकरात लवकर माहिती मिळेल आणि सरकारी योजना, शेती विषयक माहिती आणि शासकीय नोकरी विषय माहिती लवकरात लवकर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा)
1 thought on “लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांबाबत सरकारने स्पष्ट सांगितले?”