लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधननिमित्त खास भेट! या दिवशी जमा होणार 1500 रुपये; तारीख आणि वेळ निश्चित


Majhi Ladki Bahin Yojana: भावा आणि बहिणीचा सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसावर आला आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणींच्या मनात वेगळाच आनंद निर्माण होतो. प्रेम विश्वास आणि आपुलकीने भरलेला हा सण प्रत्येकासाठी नेहमीच खास ठरतो. मात्र या वर्षाच्या रक्षाबंधनला राज्यातील लाखो बहिणींना राज्य सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 1500 रुपये आर्थिक मदत जमा केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत जून महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. आणि जुलै महिन्याचा हप्ता या रक्षाबंधनानिमित्त महिलांना देण्यात येणार आहे.

रक्षाबंधन निमित्त बहिणीला गिफ्ट

राज्यातील लाखो महिलांना 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाचे निमित्त साधून जुलै महिन्याचे 1500 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सरकारने यासाठी तब्बल 746 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हा केवळ लाडक्या बहिणीसाठी आर्थिक आधार नसून त्यांच्या या सणासाठी गोडवाच आहे. महिलांच्या खात्यात महाडीबीटी द्वारे वेळेवर निधी जमा होईल याची हमी देण्यात आली आहे. कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि जुलै महिन्याचा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. Majhi Ladki Bahin Yojana

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय? आता या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन होणार पडताळणी

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभाचा अनेक महिला त्यांचा घर खर्च भागवण्यासाठी, मुलांचे शिक्षण, औषधे किराणा आणि यातून काही शिल्लक राहिले तर त्याची बचत करतात. अनेक गोरगरीब महिलांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या योजनेचा उपयोग केला जात आहे. यामुळे या योजनेच्या हप्त्याची वाट राज्यातील महिला आतुरतेने पाहत असतात. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मात्र आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांसमोर उपस्थित होत आहे.

दरम्यान सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून लाडक्या बहिणींसाठी कर्ज, व्यवसाय व बाजारपेठेची सुविधा सुरू करण्यात येत आहे. महिलांचे बचत गट स्वयंरोजगार उत्पादन विक्री यांना चालना देण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे. यामधून महिला आता केवळ मदतीसाठी गरजवंत राहणार नाही तर रोजगार निर्मिती आणि उपजीविकेच्या क्षेत्रात सक्रिय होतील. लाडकी बहीण योजना सुरू होऊन ऑगस्टमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. दरम्यान काही ठिकाणी ही योजना बंद होणार अशा अफवा पसरल्या जात आहेत. पण महिलांचा विश्वास आणि शासनाची भूमिका या योजनेबद्दल सक्रिय दिसत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधननिमित्त खास भेट! या दिवशी जमा होणार 1500 रुपये; तारीख आणि वेळ निश्चित”

Leave a Comment

error: Content is protected !!