लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण! आतापर्यंत किती पैसे मिळाले? नवीन अर्ज करता येणार का? जाणून घ्या सविस्तर


Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रामधील महिलांना स्वलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. माहिती सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा मिळाला. महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी ही योजना त्यांच्या जीवनात आर्थिक धैर्य आणण्यासाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती पैसे मिळाले आणि अजून या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे का अशा अनेक प्रश्न लाभार्थी महिलांना पडत आहेत. या लेखामध्ये आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट लाभ महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. गेल्या वर्षी 29 जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजेच बारा महिन्यात या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात एकूण 12 हप्ते जमा झाले आहेत. याचा अर्थ प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण 18000 रुपये आर्थिक मदत जमा झालेली आहे. ही रक्कम अनेक महिलांसाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाच्या छोट्या मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी उपयोगी ठरत आहे.

हे पण वाचा | LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…

या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे इतकाच नसून महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा देखील आहे. ही मदत मिळाल्याने अनेक महिलांना घर खर्चात मोठा हातभार लागत आहे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणे किंवा स्वतःच्या छोट्या गरजा पूर्ण करणे या पैशातून शक्य होत आहे. विशेष ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या या योजनेमुळे प्रबळ झाल्या आहेत. Majhi Ladki Bahin Yojana

या योजनेच्या सुरुवातीला हजारो महिलांनी मोठ्या उत्साहाने अर्ज केले होते. अनेक इच्छुक महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे का मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती त्यानंतर या योजनेचे अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आहे त्यामुळे सध्या तुम्हाला या योजनेला नव्याने अर्ज करता येत नाही. ही अर्ज प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होईल तेव्हा याबाबत सरकारकडून कोणतीही नवीन अपडेट आली नाही. त्यामुळे ज्या महिलांनी वेळेत अर्ज केला आहे त्यांनाच सध्या या योजनेचा लाभ मिळत आहे. भविष्यात अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी प्रतीक्षा करणे योग्य ठरेल.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण! आतापर्यंत किती पैसे मिळाले? नवीन अर्ज करता येणार का? जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!