Majhi Ladki Bahin Yojana: संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी द्वारे पैसे जमा केले जातात. या योजनेअंतर्गत मे महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत. यानंतर लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. महायुतीच्या सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांच्या कल्याणासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरली आहे. ही योजना संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. इतकेच नाहीतर ही योजना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात मोठी गेम चेंजर ठरली आहे.
हे पण वाचा| शेतकऱ्यांना पिक विम्याचा शेवटचा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाची अपडेट समोर..
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला आहे. आता जून महिन्याचा हप्ता नेमकं कधी मिळणार याकडे सर्व राज्यातील लाभार्थी महिलांच्या नजरा लागल्या आहेत. एप्रिल महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळाले होते त्याच प्रकारे मे महिन्याचे पैसे जून महिन्यात मिळाले आहेत त्यामुळे आता जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात मिळणार का असा प्रश्न महिलांना पडला आहे. प्रत्येक महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी पुढील महिन्याची वाट पाहावी लागत आहे. यामध्ये सुधारणा करून सरकारने ज्या त्या महिन्याचे पैसे ज्या त्या महिन्यात महिलांना द्यावेत अशी मागणी महिलांच्या वतीने केली जात आहे.
हे पण वाचा| शेतकऱ्यांनो हे कागदपत्र आहे का? तरच तुमच्या खात्यावरती ₹2000 रुपये जमा होणार
जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता 15 ते 20 तारखेच्या दरम्यान बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे अधिकृत घोषणा मिळेपर्यंत सर्व महिलांनी वाट पाहावी. लाडकी बहीण योजनेच्या पैशातून अनेक महिलांच्या घरात खाण्यासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर अनेक महिलांनी या पैशापासून आपला नवीन व्यवसाय सुरू केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभांमुळे राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या प्रबळ तयार झाल्या आहेत.
हे पण वाचा| राज्यातील या नऊ जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनो थोड सावध राहा!
या महिलांचा लाभ बंद होणार
दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांचा लाभ बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त कर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांनी लाडके बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग मोकळा झाला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून सर्व डाटा दिला जाणार आहे. ज्या महिला आयकर दाते आहेत किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांचा लाभ या योजनेतून बंद केला जाणार आहे.
हे पण वाचा| विमान कोसळण्यामागचं धक्कादायक कारण अखेर समोर! २५० पेक्षा अधिक निष्पाप जीव गमावले; देश हादरला
लाडक्या बहिणींना मिळणार 12 वा हप्ता
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्ते महाडीबीटी द्वारे जमा करण्यात आले आहेत. यानंतर जून महिन्याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना 18 हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे महिलांच्या आयुष्यातील आर्थिक दृष्टीने मोठी मदत झाली आहे. Majhi Ladki Bahin Yojana
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..”