Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत महिलांना दिली जाते. मात्र मे महिन्याच्या दोन आणि तीन तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले होते. त्यामुळे आता मे महिन्याचे पैसे मे महिना संपला आहे तरी देखील महिलांना मिळाले नाहीत. या योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचे पैसे कधी मिळतील असा प्रश्न पडला आहे.
लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात मिळाल्यामुळे मे महिन्याचा लाभ हा कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान सरकारकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या आखेरीस लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सध्या मे महिना संपून तीन दिवस झाले आहे तरी देखील लाडक्या बहिणींना या योजनेचा हप्ता मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मे महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणीसाठी मे महिन्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली असल्याची माहिती देखील दिली होती.
हे पण वाचा | आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही? पहा..
मात्र अजूनही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता मिळू शकला नाही. पण आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना यावेळी हप्त्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना अकरावा आणि बारावा म्हणजेच मे आणि जून अशा दोन महिन्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा चा सण येत आहे आणि याच वटपौर्णिमेच्या स्तनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणीच्या खात्यात मे आणि जून अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करू शकतात. अशी बातमी मीडिया रिपोर्ट्स मधून समोर आली आहे. मात्र याबाबतचे अधिकृत माहिती अजून देखील मिळालेली नाही. दहावा हप्ता जमा करताना सुद्धा असेच सांगितले जात होते. दहावा आणि अकरावा हप्ता सोबत जमा होईल असा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेच्या खात्यात फक्त दहावाच हप्ता जमा झाला होता. यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात अकरावा आणि बारावा हप्ता सोबत जमा होणार का असा प्रश्न महिलांना पडला आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतून 19 लाखाहून अधिक महिला अपात्र; तुम्ही या सरकारी पडताळणीत आलात का?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब लाभार्थी महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला जात आहे. यामध्ये विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार अशा महिलांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे देखील आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ घेण्यासाठी त्या महिलाकडे ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन नसावे. त्याचबरोबर स्वतः महिला किंवा कुटुंबातील इतर कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसावा. आमदार खासदार यांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जात नाही. त्याचबरोबर कुटुंबातील कोणत्याही सदस्य आयकर दाता देखील नसावा. अशा अनेक वेगवेगळ्या निकषाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. Majhi Ladki Bahin Yojana
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी आनंदा बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार ₹3,000? मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र”