लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये; कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत मार्च महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. लवकरच या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता या योजनेचा एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत.

हे पण वाचा | SBI अंतर्गत राबवण्यात येत आहे भन्नाट योजना; नागरिकांना मिळणार 24,904 रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना

लाडकी बहीण योजनेची अर्जाची पडताळणी पाच टप्प्यामध्ये केली जात आहे. यात आतापर्यंत ज्या महिला दोन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही निकषा बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाण्याची शक्यता आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेसाठी 2.53 कोटी महिला लाभार्थी आहेत. या महिलांच्या लाभाची अपेक्षित रक्कम 37 हजार 950 कोटी रुपये आहे. बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 34 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार उरलेल्या पैशासाठी काय करणार असा प्रश्न अनेकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्नाचे पडताळणी काटेकोरपणे केली जाणार आहे.

हे पण वाचा | Ration Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! पंधरा दिवसात हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

या अगोदर देखील लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाखो महिलांना बाद करण्यात आले आहे. यामध्ये ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून बाद केले आहे. त्यानंतर आता ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे. जर पडताळणी दरम्यान तुमचे उत्पन्न जास्त असल्याचे निदर्शनात आले तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana

दरम्यान होणाऱ्या उत्पन्नाच्या पडताळणीत ज्या महिला अपात्र ठरवल्या जातील त्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तोपर्यंत या योजनेअंतर्गत उत्पन्नाची पडताळणी पूर्ण केली जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये; कारण काय?”

Leave a Comment

error: Content is protected !!