Majhi Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी राज्य शासनांतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्त्वकांक्षा योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभार्थ्यांची फेर चाचणी सुरू आहे. या प्रक्रिया नंतर जवळपास आठ लाख महिलांना दरमहा फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत. अशी माहिती हाती आलेली आहे. Majhi Ladki Bahin Yojana
या निर्णया मागे काही महत्त्वाचे कारण सांगण्यात येत आहे. काही महिलांना इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे. जसे की, नमो शेतकरी महा सन्मान निधी (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळत आहे. त्या महिलांना आता यापुढे दर महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्रातील महिलांसाठी राबवण्यात येणारे सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी एक आर्थिक स्त्रोत निर्माण झालेला आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा योजनेचा उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र असल्यामुळे महिलांना दीड हजार रुपये मिळतात.
सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज प्राप्त झालेले होते. मात्र फेर तपासणीनंतर आता ही संख्या घटून 2.46 झालेली आहे. परंतु आता याबाबत एक सरकारी मोठा निर्णय घेतलेला असून ज्या महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना यापुढे फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
या महिलांना मिळणार ₹1500 रुपये ऐवजी ₹500
राज्य शासनाने लाभार्थ्यांची यादीची तपासणी केल्यानंतर काही गोष्टी आढळून आलेले आहेत. अनेक महिला अशा आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना आधीच एक हजार रुपये मिळत आहेत. यामुळे आठ लाख महिलांची रक्कम कापली गेली आहे आता त्यांना यापुढे फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहे.
राज्य शासनाची महत्त्वाची भूमिका
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पूर्वी संकेत दिले होते की लाभार्थ्यांची तपासणीनंतर संख्या कमी होणार आहे. शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये 2.63 कोटी अर्ज मंजूर केले त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये 2.52 कोटी अर्ज त्यानंतर अंतिम मार्च 2025 मध्ये अंतिम लाभार्थी संख्या 2.46 कोटी. सरकारचे म्हणणे आहे की, त्यामुळे पात्र महिलांनाच लाभ मिळण्यास मदत होईल आणि ही योजना पारदर्शकपणे पार पडेल.
कोणत्या महिलांवर परिणाम होणार?
8 लाखाहून अधिक महिलांना आता दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये मिळणार आहेत त्या महिलांना आधीच NSMN योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे त्यांना आता लाडक्या बिन योजनेमधून फक्त केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत. ते बदल फक्त शेतकरी कुटुंबातील महिलांवर त परिणाम करणार आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी होणार जमा?
आता महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्ताकडे आतुरता लागलेला आहे अशातच काही प्रसार माध्यमांमध्ये लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता हा 30 एप्रिल रोजी महिलांच्या खात्यावर ती जमा करण्यात येणार अशी शक्यता वर्तणूक येत आहे या दिवशी अक्षया तृतीया च्या मुहूर्तावर हा आता महिलांच्या खात्यावरती जमा होईल असे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! ₹2100 सोड आता महिलांना ₹1500 मिळणे होणार बंद, काय आहे कारण?