महिंद्रा स्कॉर्पिओ-N ला नवा Z8T ट्रिम आणि ADAS टेक्नोलॉजी, किंमत पाहून आनंदाने उड्या मारू लागताल


Mahindra Scorpio-N Z8T : भारतीय SUV चाहत्यांसाठी महिंद्राकडून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तीन वर्षांपूर्वी बाजारामध्ये झळकलेली स्कार्पिओ N आता नव्या अवतारात पुन्हा चर्चेत आलेली आहे. कंपनीने यामध्ये नवीन Z8T ट्रिम केला आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ₹20,29 लाख शोरूम किंमत आहे. विशेष म्हणजे स्कार्पिओ N च्या Z8L वेरेंत मध्ये आता ADAS म्हणजे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम देखील देण्यात आलेली आहे, जी एक प्रगत तंत्रज्ञान सुविधा आहे. Mahindra Scorpio-N Z8T

Z8T ट्रिम मध्ये काय नवीन आहे ?

Z8 आणि Z8L यांच्यामध्ये बसणारा Z8T ट्रिम ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरणार आहे. या ट्रिममध्ये मिळणाऱ्या खास वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट केलेले आहे. ऑटो-डिमिंग IRVM (अंतर्गत रियर व्ह्यू मिरर)

समोरचे व्हेंटिलेटेड सीट्स, 12 स्पीकर Sony ब्रँडेड साउंड सिस्टम, फ्रंट कॅमेरा आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स, 6-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, R18 डायमंड कट अलॉय व्हील्स ही सर्व वैशिष्ट्यं या ट्रिमला एका प्रीमियम SUVच्या लीगमध्ये आणतात.

हे पण वाचा | पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!

ADAS (Advanced Driver Assistance Systems) ची जोड

Z8L ट्रिममध्ये महिंद्राने आता Level-2 ADAS सुविधा जोडली आहे. ही तंत्रज्ञान फक्त इलेक्ट्रिक किंवा लक्झरी SUV मध्ये पाहायला मिळत होती. आता स्कॉर्पिओ-N सारख्या डिझेल आणि पेट्रोल IC इंजिन SUV मध्येही ती उपलब्ध आहे. यात खालील प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे

Adaptive Cruise Control (Stop & Go फिचरसह), Lane Keep Assist, Smart Pilot Assist,Forward Collision Warning, Automatic Emergency Braking,Traffic Sign Recognition, High Beam Assist, Lane Departure Warning, Speed Limit Assist (महिंद्रासाठी पहिल्यांदाच)

Speed Limit Assist ड्रायव्हरला वेग मर्यादा ओळखण्यास आणि क्रूझ स्पीड त्यानुसार बदलण्यास मदत करते. तर, Front Vehicle Start Alert सिग्नलवर थांबलेल्या वाहनांसाठी विशेष उपयुक्त आहे -समोरील वाहन सुरू झालं की ती सूचना देते.

किंमती व्हेरिएंटनुसार

Z8T ट्रिमः

  • पेट्रोल मॅन्युअल: ₹20.29 लाख
  • पेट्रोल ऑटोमॅटिकः ₹21.71 लाख
  • डिझेल 2WD मॅन्युअल: ₹20.69 लाख
  • डिझेल 2WD ऑटोमॅटिक: ₹22.18 लाख
  • डिझेल 4WD मॅन्युअल: ₹22.80 लाख
  • डिझेल 4WD ऑटोमॅटिक: ₹24.36 लाख

Z8L (ADAS):

  • पेट्रोल मॅन्युअल: ₹21.35 लाख
  • पेट्रोल ऑटोमॅटिकः ₹22.77 लाख
  • डिझेल 2WD मॅन्युअल: ₹21.75 लाख
  • डिझेल 2WD ऑटोमॅटिक: ₹23.24 लाख
  • डिझेल 4WD मॅन्युअल: ₹23.86 लाख
  • डिझेल 4WD ऑटोमॅटिक: ₹25.42 लाख

Z8L ADAS (6-Seater Special):

  • पेट्रोल मॅन्युअल: ₹21.60 लाख
  • पेट्रोल ऑटोमॅटिक: ₹22.96 लाख
  • डिझेल 2WD मॅन्युअल: ₹22.12 लाख
  • डिझेल 2WD ऑटोमॅटिक: ₹23.48 लाख

महिंद्राच्या Scorpio -N या मॉडेलने अल्पावधीतच मोठा यशस्वी प्रवास केलेला आहे केवळ तीन वर्षांमध्ये 2.5 लाखाहून अधिक गाड्या विकल्या गेलेल्या आहेत आणि रस्त्यावरती धावू लागलेले आहेत. यामुळेच कंपनीने आता यामध्ये अधिक आकर्षक वैशिष्ट्य आणि सुरक्षितता वाढवणाऱ्या टेक्नॉलॉजी जोडून ग्राहकांसाठी अनुभवा आणखी समृद्ध केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!