Mahavitaran Payment Wallet: विज बिल भरणे प्रत्येकांना त्रासदायक काम वाटतं. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना वीज बिल भरण्यासाठी बँकेच्या लांब रांगेत उभारावे लागते किंवा भरणा केंद्रावर जाऊन वीज बिल भरावे लागते. पण आता ही चिंता मिटणार आहे. महावितरण ने ग्राहकांच्या सोयीसाठी एक खास पेमेंट वॉलेट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे विज बिल भरणा तर सोपं झालंच आहे त्याशिवाय ग्रामीण भागातील तरुणांना छोट्या दुकानदारांना रोजगाराची संधी देखील निर्माण झाली आहे. महावितरण चे पेमेंट वॉलेट म्हणजे एक डिजिटल पेमेंट सुविधा आहे. ही सुविधा वापरून तुम्ही कोणत्याही महावितरण ग्राहकांचे विज बिल ऑनलाईन भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे या वॉलेटचा वापर करून तुम्ही केवळ स्वतःतच नाही तर इतरांचे वीज बिल देखील भरू शकता.
जर तुमच्या गावामध्ये एखादे किराणा दुकान असेल तुम्ही तुमच्या दुकानात हे वॉलेट वापरू शकता. यामुळे गावातील लोकांना वीज बिल भरण्यासाठी शहरात जावा लागणार नाही. ते तुमच्या दुकानात येऊन वीज बिल भरू शकतात आणि विज बिल भरण्याची पावती त्यांच्या मोबाईलवर लगेच मिळेल. तुम्ही एकाच वॉलेट मधील बॅलन्स वापरून अनेक ग्राहकांचे वीज बिल भरू शकता. जर तुम्ही तुमच्या गरजेनुसार किमान 5000 ते कमाल एक लाख रुपये पर्यंतची रक्कम वॉलेटमध्ये जमा करू शकता. डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग द्वारे तुम्ही सहजपणे वॉलेट रिचार्ज करू शकता. Mahavitaran Payment Wallet
हे वॉलेट व्यवसायकांसाठी खूपच फायद्याचे ठरत आहे. तुम्ही जर छोटे व्यावसायिक असाल जसे की किराणा दुकान, मेडिकल स्टोअर किंवा इतर कोणताही छोटा व्यवसाय करत असाल तर तुम्ही या वॉलेट द्वारे तुमच्या परिसरातील लोकांचे वीस बिल भरून कमिशन मिळवू शकता. यामुळे तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि तुमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढेल. त्यामुळे गावातील लोकांना शहरात किंवा बँकेत जाण्याचे गरज भासणार नाही. म्हणूनच महावितरणाच्या वतीने सर्व व्यावसायिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा| 9.7 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2,000 खात्यात जमा; तुम्हाला मिळाले का नाही असं चेक करा
अर्ज कसा करावा?
जर तुम्ही वॉलेट मिळू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रे द्यावे लागणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट फोटो
- कॅन्सल चेक
- विज बिल
- भाडेकरारनामा
ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळील महावितरण कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत जागेची पडताळणी झाल्यावर तुम्हाला वॉलेट वापरण्याची परवानगी दिली जाईल. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये वॉलेट सुविधांचा लाभ घेतला जात आहे. स्वतःसाठी एक नवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही महावितरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.