Maharastra Rain Update: मागील काही दिवसापासून विदर्भ आणि इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आता हळूहळू कमी झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्या नंतर राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखीन कमी होणार आहे. परंतु २० जुलै नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामानाने बघाना वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसापासून विशेष विदर्भात झालेला जोरदार पावसामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पुराचे पाणी वेगाने ओसरत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत सुरू झाला असून बंद झालेले रस्ते देखील हळूहळू सुरू झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसाच्या पावसा नंतर पूरस्थिती निवडली असून बंद झालेले 21 मार्ग आता पुन्हा सुरू झाले आहेत. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली असली तरी महसूल विभागाने पंचनाम्याला सुरुवात केली आहे. चंद्रपूर मध्ये 55 घराची पडझड झाली असून शेकडो हेक्टर शेतीत पुराचे पाणी शिरले आहे.
हे पण वाचा| तुरीच्या आवकेत मोठी घट! ‘या’ बाजरात मिळाला सर्वात जास्त दर; वाचा सविस्तर
गडचिरोली जिल्ह्यातील वेनगंगा नदीचा पूर ओसरला असल्याने काही मार्ग सुरळीत सुरू झाले आहेत. सध्या समुद्र पट्टीपासून 4.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. 11 ते 14 जुलै या कालावधीत राज्यातील काही भागात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागांना वर्तवला आहे. विशेषता भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. Maharastra Rain Update
जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाडा वगळता इतर अनेक भागात पावसाने मोठी तूट निर्माण केली होती. जुलै च्या सुरुवातीला मराठवाडा आणि विदर्भात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या चार दिवसात विदर्भात झालेल्या दमदार पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघली आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील ज्यामुळे पूरग्रस्त भागात काही प्रमाणात दिलासा मिळेल. मात्र 20 जुलै नंतर पुन्हा राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे. सध्या तरी वेनगंगा प्राणहिता आणि गोदावरी नद्या 100% भरून वाहत असल्याने नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
1 thought on “महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार! मात्र या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस होणार..”