Maharashtra Weather Updates News: महाराष्ट्र उन्हाचा तडाका ओसरला असताना आता नव्या संकटाची चांहूल लागली आहे. आकाशात पुन्हा एकदा काळे डाग दाटले आहेत आणि वाऱ्यांनी वेग पकडायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या झळांनी बळीराजा जरा सावरतोय तोच पावसाचा संकट दाराशी थांबलेले दिसते. अरबी समुद्रावरून येणारे वारे हे ढग काही साधे सुधे नाहीत, तर यामध्ये वादळी वारे विजांचां कडकडाट आणि गारपीटीचा मोठा धोका लपलेला आहे. राज्यामध्ये तब्बल 25 जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. Maharashtra Weather Updates News
शेतकऱ्यांनी आधीच उन्हाळी पीक काढणी केली, काहींनी शेतीच्या तयारीला सुरुवात केली, पण अचानक हवामानात इतका मोठा बदल होईल असं कोणालाच वाटत नव्हतं. आता यामुळे शेतीचे गणित बिघडला आहे कारण हा पाऊस फक्त धुळीतून वाहून जाणारा नाही तर गारांसह वादळ घेऊन येणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, पुढचे पाच दिवस राज्यात वाऱ्यांची दिशा सारखी बदलत राहणार आहे. त्यामुळे ढग कुठेही जमा होऊ शकतात आणि संध्याकाळच्या सुमारास अचानक पाऊस आणि वीजा कोसळू शकतात. काही भागांमध्ये तर ताशी 40 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जनावरांसाठी उभारलेली झोपडी, किंवा अर्धवट बांधकाम यांचा मोठ्या नुकसान होऊ शकतं.
सगळ्यात जास्त धोका कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आहे जिथे जिथे आता उष्णतेची झळ भासत होती. तिथे आता गारटा जाणवतोय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाला असून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय जळगाव, नंदुरबार, नगर, सांगली, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, लातूर धाराशिव इत्यादी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून कुठेही हलकासा पाऊस तर कुठे वादळ सदृश्य परिस्थिती उद्भवू शकते.
दुसरीकडे जिथे घाटमाथा आहे जसं नाशिक पुणे सातारा कोल्हापूर किती विशेष वादळाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने माहिती दिली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
शेतकऱ्यांनी आता काढलेला धान्य, हरभरा, गहू किंवा भुईमूग अशा पिकांचे योग्य साठवण करावं, कारण एकदा गारपिटीचा मारा झाला की हातात आलेला पीक ही नष्ट होण्याची शक्यता असते. आंबा, डाळिंब, द्राक्षाचे शेतकरी सावध राहा, फळ झाकण्यासाठी प्लास्टिकचा वापर करा. जनावरांना उड्यावर बांधू नका विजांचा कडकडाट झाल्यास झाडाखाली उभा राहणार टाळा.
या वर्षी देखील मे महिन्यात अशीच काही परिस्थिती बदलली आहेत प्रत्येक बदल वेळेचा ओळखणं आणि त्याला तोंड देण्यासाठी योग्य पावला उचलणे हे आपल्या हातात असतं. त्यामुळे पुढचं पाच दिवस सगळ्यांनी सतर्क रहा, मोबाईलवर हवामान खात्याचे अपडेट पाहत राह आणि गरज असल्यास आपल्या शेतकऱ्यांनी सावध राहा.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो तयारीला लागा! मान्सून लवकर येणार! या तारखेला होणार महाराष्ट्रात दाखल वाचा सविस्तर