Maharashtra Weather Updates : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने आणि शासनाने एक मोठा अंदाज जारी केलेला आहे. यामध्ये त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधवांना व नागरिकांना मेसेज पाठवला आहे यामध्ये त्यांनी “पुढील ३ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ६०-७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय” मेसेज पाठवून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क आव्हान केले आहे. Maharashtra Weather Updates
तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पुढील तीन तासासाठी वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तात्काळ सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वारे 30 ते 40 किमी वेगाने वाहणार आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर शहर सह करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यांमध्ये हवामान अधिक खवळलेला राहील, ती शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या अचानक बदलामुळे हवामानात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे शहर आणि ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.
अपत्कालीन मदतीसाठी संपर्क ठेवा
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी किंवा स्थानिक प्रशासनाचे तात्काळ संपर्क साधावा. हवामान खात्याचे अपडेटवर लक्ष ठेवावे घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवावी आणि पाण्याने वेडलेल्या भागातून प्रवास करणे टाळा.
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेल्या असून, नागरिकांनी देखील सावधगिरीत आणि जबाबदारीने वागण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | Monsoon Update 2025 : शेतकऱ्यांनो कामे लवकर उरका! या तारखेला राज्यात दाखल होणार मान्सून