महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी बातमी! राज्यावरती पुन्हा दुहेरी संकट! या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Updates : राज्यातील शेतकऱ्यांनी कडे लक्ष द्या, पुन्हा राज्याच्या हवामानामध्ये एकदा बदल झाला आहे. अशातच तुम्हाला हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुमच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे वायला जाऊ शकतो. एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल झालेला दिसत आहे. एका बाजूला उष्णता वाढत असल्याने राज्यातील मराठवाडा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जिल्हे होरपळून निघाले आहेत. अशातच पुन्हा एकदा विदर्भात आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमी वरती राज्यात दुहेरी संकट निर्माण झाला असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. Maharashtra Weather Updates

गेला काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमान सातत्याने बदलत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे या भागात तापमान 44° वर पोहोचल्या असून उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना मोठा त्रास जाणवत आहे. सध्या पुणे शहरात दिवसाचे तापमान 42 माणसांच्या पुढे गेला आहे उन्हाच्या झळांनी नागरिकांना मोठे चटके बसत आहेत.

हवामान खात्याने या जिल्ह्यासाठी गेलो अलर्ट जारी केला असून लहान, वयोवृद्ध हे व्यक्ती आजारी पडू शकते त्यामुळे घराबाहेर जाणा टाळावे, पुरेशी पाणी घ्यावे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे.

तर आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळी झालेला आहे. बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग 50 किमी ताशी पर्यंत पोहोचू शकतो अनेक भागात गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या पावसामुळे एकीकडे उन्हाळ्या पासून दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी दुसरीकडे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भुईमूग, हरभराने तर उन्हाळी पिकांना मोठा फटका बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासनाने मदत करणे खूप आवश्यक आहे.

हे पण वाचा | Cyclone Alert | 50 वर्षात सर्वात मोठे चक्रवादळ धडकणार; नवीन हवामान अंदाज पहा

Leave a Comment

error: Content is protected !!