Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस मोठ्या वादळाचा इशारा; शेतकऱ्यांनो सावध रहा!


Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकरी, सामान्य जनता आणि प्रवासी वर्गासाठी हवामान खात्याने मोठा दिलेला आहे. राज्यात खरं तर गेला काही दिवसांपासून मोठ्या वातावरणात बदल झालेला आहे अचानक कुठेही अवकाळी पाऊस पडतोय यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा द्राक्ष फळबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वर्षातून एकदा येणारा फळ म्हणजे आंबा या पिकाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.Maharashtra Weather Update

लोकांना थोडासा आराम हवा होता परंतु आता आराम करण्याचे दिवस संपले आहे आणि त्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिथं उष्णतेचा त्रास अधिक आहे तिथे पावसाने दिलासा दिला असला तरी काही भागांमध्ये याच पावसाने धोका निर्माण केला असून जीवित हानी होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

पश्चिम बंगाल नांदिया आणि जलपाईगुडी जिल्ह्यात विज कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या लोकांनी पावसात ओल्या होण्यापासून बचाव साठी झाडाखाली आसरा घेतला होता, आणि त्याच वेळी अचानक वीज कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत पाच जण भाजले असून, याच पार्श्वभूमी वरती महाराष्ट्रात नागरिकांनी वीज पडण्याच्या वेळी झाडांच्या खाली उभा राहणं टाळावं, अशी शिफारस केली जात आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार , महाराष्ट्र 17 मे पासून पुढील तीन दिवस हलक्या पावसा सह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. पार्श्वभूमी वरती देशातील गोवा, कर्नाटक, तसेच केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगाना यासारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात मध्ये भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा यासारख्या राज्यांमध्ये जोरदार वादळांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये ही वादळाची स्थिती कायम आहे.

राज्यात लवकरच आता पेरणीचे दिवस सुरू होणार आहेत त्यापूर्वी शेतकरी बांधवांनी हवामान बदलाचा विचार घेऊन तयारी करणे आवश्यक आहे. जमिनीची मशागत करताना पावसाचे वेळापत्रक पाहून पुढील योजना आखावी असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याशिवाय, घराघरात राहणाऱ्या लोकांनी देखील विजांच्या तारा, उघड लाकूड किंवा पाण्यातून वीज वाहण्याची शक्यता असलेली साधना यांपासून लांब राहावा. विशेषता लहान मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्यास म्हटले जात आहे.

17 मे : महाराष्ट्रात वादळीवारण सह अलका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यात पार्श्वभूमी वरती कोकण विदर्भामध्ये संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात.

18 मे: पाऊस आणि वाऱ्यांचा जोर वाढणार असून काही ठिकाणी वीज चमकण्याची शक्यता आहे. घराबाहेर प्रवास करताना योग्य खबरदारी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.

19 मे: मुसळधार पावसाची शक्यता तुम्ही असली तरी वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढू शकतं. काही भागात पाऊस नसला तरी आकाश ढगाळ राहील, आणि आद्रतेमुळे दमट वातावरण जाणवेल.

राज्यांमध्ये मान्सून सुरू होण्याआधी हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच शेतीची मशागत आणि लवकरच सुरु होणारे पेरणी अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे हीच काळाची गरज आहे.

हे पण वाचा | Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!

Leave a Comment

error: Content is protected !!