Maharashtra Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात हवामानाने नवा ओळख घेतला आहे. उष्णतेच्या तीव्र झाला आणि वादळाच्या इशाराने नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई सह राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या कहर आणि दुसरीकडे नागपूर भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर सारख्या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे. हवामान खात्याने 19 राज्यात वादळी वाऱ्याचा इशारा दिला असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. Maharashtra Weather Update
राजस्थान समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचावर चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण तमिळनाडू वर होत आहे. यामुळे या भागांमध्ये हवामानात मोठा बदल झाला असून, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटणे जोर धरलेला आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढला असून, उकडाही प्रचंड प्रमाणात जाणवत आहे.
शनिवारी नागपूर मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागात गारपीटी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाबरोबर गाऱ्यांचा मारा झाला आहे. पावसामुळे उष्णतेपासून कैसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या वाऱ्यांनी व गारांनी शेतीसह नागरिकांचे नुकसान केल्याचे प्राथमिक अहवालातून समजते.
मुंबईत गेल्या काही आठवड्यापासून तापमान सतत वाढतच आहे. यामुळे नागरिकांमध्ये उष्णतेचे परिणाम पाहायला मिळत आहे. नागरिकांना डोकेदुखी, तर काही ना घसा दुखी, तर मळमळ थकवा आणि चक्कर येणे अशा समस्या जाणवत आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या मते, वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
उष्माघातासारख्या स्थिती पासून बचाव करण्यासाठी मुंबई महापालिकेने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केलेले आहेत. दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, शक्य असल्यास पांढरे किंवा हलक्या रंगाचे सेलर कपडे वापरावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हामुळे घसा दुखणे सर्दी आणि डोकेदुखीचे रुग्ण वाढत आहेत
हवामानातील अचानक बदल आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता, नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरज नसल्यास उन्हात बाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्यावे आणि थंड पदार्थांचा समावेश करा. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
राज्यात सध्या हवामानात सतत चढउतार दिसत असून उष्णते सोबत वादळी वाऱ्यांचा आणि गारपीचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनाकडे लक्ष द्यावे आणि आपली व आपल्या कुटुंबाची आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज