Maharashtra Weather Update : राज्यामध्ये एप्रिल महिना सुरू होताच अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत काही ठिकाणी गारपीटीचा फटका देखील बसलेला आहे अशाच पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना होत असल्याचा पाहायला मिळत आहे.
विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली. Maharashtra Weather Update
या भागात पडणार पाऊस
भारतीय हवामान खात्याच्या नुकत्याच ताज्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलकी ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागांमध्ये ताशी किमी 30 ते 40 वेगाने वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी भारतीय हवामान खात्याचा हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आणि योग्य ते नियोजन करायचे आहे. हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने, शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
या काळामध्ये शेतकऱ्यांची व नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या काळात वादळी वाऱ्याचा इशारा असल्यामुळे घरांचे पत्रे उडणे पत्रे कोसळणे, झाडांच्या फांद्या पडणे, झाडे उठून पडणे, विजांच्या तारा पडणे, घटना घडत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांसह नागरिकांनी विशेष काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. आणि हा हवामान अंदाज आपल्या जवळच्या मित्राला व सार्वजनिक ग्रुप वरती शेअर करा जेणेकरून त्यांना लवकरात लवकर याची माहिती मिळेल आणि अशाच हवामाना अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा.
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा