Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होणार? या 25 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Weather Update : सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाळी चित्र आपल्याला पाहायला मिळाला लागला आहे. अशाच गेल्या दोन दिवसापासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत आहे आणि भारतीय हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. विशेषता विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती अशा भागांमध्ये नदी नाले धोक्याचे पातळी वाहून लागलेत, काही भागात तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेत शिवार जलमय झाले, सकल भागात पाणी साचले, अनेक रस्ते बंद झालेत, घरात पाणी घुसून जनतेचे मोठा नुकसान झालंय एकंदरीत पाऊस आता वरदानापेक्षा संकट बनू शकतो. Maharashtra Weather Update

ऑरेंज अलर्ट जाहीर – कुठे किती धोका?

हवामान खात्याने आज नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी. या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट, तुफान वारे आणि संभाव्य पूर परिस्थितीचा धोका वर्तवण्यात आलेला आहे.

तर येलो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आला आहे ते म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला. या भागात जोरदार सरींमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवामान विभागाने दिलेला हा अंदाज खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे वरील दिलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि पुढील नियोजन करायचे आहे तसेच पुढच्या हवामान अंदाज साठी आम्हाला फॉलो करत चला.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

Leave a Comment

error: Content is protected !!