Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, राज्यात हवामान विभागाने पुन्हा इशारा दिलेला आहे आणि या वेळेस नुसता इशारा नसून मुसळधार पाऊस पडणार असल्याने तुमची चांगली फजिती होऊ शकते. त्यामुळे पावसापूर्वी काही नियोजन करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकऱ्यांना देखील शेतातील कामे करण्यास वेळ मिळाला. आता पावसाने मनावर घेतला आहे. आणि तो पुन्हा येत आहे नऊ जून पासून राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायल मिळत आहे. या पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने 23 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, कोकण सह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात आजपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली. विशेषता: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ आणि 12 जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार असं म्हटले जात आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही आठ ते 12 जून दरम्यान पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे. Maharashtra Weather Update
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, यासारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे संकेत मिळाले आहेत. तर 11 आणि 12 जून रोजी विदर्भात देखील पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या हवामान अंदाजानुसार चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. सध्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरजेच आहे. Maharashtra Weather Update
या 23 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी (Yellow alert issued in these 23 districts)
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, अहिल्यानगर, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, वाशिम अशा 23 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या या तारखेपासून पावसाची राज्यात बॅटिंग सुरू; नवीन अंदाज काय म्हणतोय पहा