Maharashtra Weather Update : सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे उन्हाचे चटके फेब्रुवारी महिन्यात बसत असताना यंदाचा उन्हाळा कडक असल्याचे जाणवत आहे. पहाटे कारवा तर दुपारी तीव्र उष्णतेचा अनुभव नागरिकांना पाहायला मिळत आहे. राज्यभरामध्ये कमल तापमान 35 ते 40°c दरम्यान पोहोचले असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोती वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तापमानात चार ते पाच अंशाने वाढ झाली असून पुढील काही दिवसात उन्हाचा तडाका अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. Maharashtra Weather Update
राज्यात कोणत्या शहरात तापमान किती ?
पुण्यामध्ये कमल तापमान 35.8° सेल्सिअस वर पोहोचले असून, ठाण्यामध्ये 36.6° सांगलीमध्ये 37.1° तसेच साताऱ्यामध्ये 35.3° नोंदवले गेले आहे. विशेषता विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान नोंद झालेली आहे. अकोला येथे ३७.8 अंश सेल्सिअस झाली. ब्रह्मपुरी, अमरावती, वाशिम आणि इतर जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे.
IMD चा अंदाज काय सांगतो?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पुढील काही दिवस उन्हाचा प्रभाव कायम राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रसिद्धीची तीव्रता अधिक वाढली आहे. सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा नसला तरी उन्हाचा चटका दिसून दिवस वाढत आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा
पुढील काही दिवस तापमान कसे राहणार?
- दक्षिण कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमान 1 ते 2 अंशाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस विदर्भात तापमान स्थिर राहील. पुढील तीन दिवस मोठा बदल होणार नाही परंतु त्यानंतर दोन ते तीन अंशाने घट होऊ शकते. किमान तापमान एक ते दोन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.
वातावरणात बदल होणार का?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भामध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहू शकते आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत काहीसा दिलासा मिळणार आहे.
सावधगिरी कशी बाळगावी?
दुपारी बारा ते तीन दरम्यान शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. भरपूर पाणी आणि द्रव्य पदार्थाचे सेवन करा. हलका आणि सुती कपडा परिधान करा. उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा गॉगल चा वापर करा.
महाराष्ट्रामध्ये उन्हाचा प्रभाव वाढत असून, काही दिवस तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. अशाच हवामान विभागाच्या अपडेट साठी नियमित आमच्या अधिकृत पेजला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल आणि स्क्रीनवर दिलेल्या पर्यायाचा वापर करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन.