Maharashtra Weather News : राज्यभरात अवघ्या काही दिवसांपूर्वी दमदार आगमन करणाऱ्या माणसांनी आज मात्र थोडेसे काही भागात विश्रांती घेतल्याचा पहिला मिळत आहे. परंतु हे चिन्ह शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण त्यांना शेतातील कामे करण्यासाठी वेळ हवा होता. तो आता वातावरण निवळल्यामुळे मिळाला आहे. Maharashtra Weather News
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केरळ मार्गे तळ कोकण आणि थेट मुंबईपर्यंत धडक देणाऱ्या या पावसाने मे महिन्यातच सर्व विक्रम मोडले आहेत. मुंबईकरांपासून कोकणवासीयांपर्यंत सगळेच म्हणत होते. “यंदाचा पाऊस काही थांबायचं नाव देत नाही” पण आता वाऱ्याचे दिशा बदलली आणि त्याचबरोबर पावसाचे रूप पण. मागील 24 तासांपासून मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरला आहे. समुद्र शांत झाला आहे, रस्ते कोरडे दिसू लागलेत आणि आभाळत घनदाट काळे डाग साम्राज्य जुनं विरघळलं चाललंय.
हे पण वाचा | मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, या सहा जिल्ह्यांना मोठा इशारा
पण या शांततेचा पार्श्वभूमी वरती राज्यात काही भागांमध्ये मात्र पावसाचा थैमान सुरूच आहे. बार्शी जिल्ह्यात कळम तालुक्यातील काही भागात डग फुटीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही तासात एवढा पाऊस पडला की गावातल्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं. लोक उघड्यावर आले, शेतकऱ्यांची शेतजमीन जलमय झाली, आणि अतिवृष्टीमुळे लोकांना एकाच हंबरडा फुटला “ही अस्मानी मारामारी कधी थांबणार?”
राज्यातील इतर भागाप्रमाणे विदर्भात देखील हवामान मोठ्या प्रमाणात बदलला आहे आणि या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या सुरू केल्या असताना, आता या मुसळधार पावसाने खरीप पिकांसाठी काहीसा धोका निर्माण केला आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 50 ते 60 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि या विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमी वरती चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये काळजी घेण्याची गरज आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, घाटमाथा भगाने दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आता महाराष्ट्रात मान्सून ने जोरदार सुरुवात केली असली तरी आता त्यांच्या चालन्यात ब्रेक लागण्याचे स्पष्टपणे जाणवते. काही भागात पावसाने थैमान घातले, तर काही ठिकाणी नागरिकांना दमट वातावरण आहे मोठा त्रास दिला आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवायचे झाल्यास, पुढील काही भागात मान्सून पुन्हा जोमाने बरसणार हे नक्की आहे, तोपर्यंत नागरिकांनी हवामानाच्या सतत बदलणाऱ्या स्वरूपाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.