Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट (Maharashtra Batami) समोर येत आहे. त्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार (Heavy Rain) पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा एक मोठ संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रावर एक चक्रीवादळाचा (Maharashtra cyclone) परिणाम दिसून येणार आहे. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार नाही परंतु याचा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवरती गारपीटीच (Hail Alert) संकट निर्माण झालेला आहे. Maharashtra Weather News
या जिल्ह्यांना इशारा (Warning to these districts)
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी गारपीट पडणार नसून, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होईल असा अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे खूप आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे नुकसान होणार आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार, 13 आणि 14 एप्रिल रोजी सिंधुदुर्गात पावसाचा इशारा आहे. तर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर महाराष्ट्रातील जळगाव येथे देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. तर 13 आणि 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
तर राज्यातील हवामानात बदल झाल असल्याने राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ते काही भागात वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच हळूहळू पावसाची तीव्रता कमी होईल आणि पावसामुळे कमाल वातावरण तीन ते पाच डिग्री पर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या या हवामान अंदाज याकडे लक्ष देऊन शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे गरजेचे आहे. अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!
1 thought on “Maharashtra Weather News : पुढचे 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा; वाचा सविस्तर माहिती”