Maharashtra Weather Forecast | राज्यातील हवामानाबाबत पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने एक मोठा इशारा दिलेला आहे यामुळे नागरिकांचे टेन्शन वाढणार आहे चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज काय? Maharashtra Weather Forecast
फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात सातत्याने चढउतार होत होता. खरे तर फेब्रुवारी महिन्यातच मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे. सरासरी होळी नंतर तापमानात वाढ होत असते, परंतु यावर्षी लवकरच तापमानात वाढ झालेली आहे. भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार, मार्च महिन्यामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. काही ठिकाणी तापमान 40°c च्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या आवाहन करण्यात आलेले आहे.
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान वाढणार आहे
राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान सामान्य पेक्षा अधिक नोंदवले जात. तर काही ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी सध्या तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आलेली आहे. विशेषता; कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुढील दोन दिवसांमध्ये तापमान दोन ते तीन अंशाने आणखी वाढवण्याची शक्यता. यामुळे कोकणात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
तसेच विदर्भात देखील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या ऊणाच्या झळा सहन करावा लागत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी घर बाहेर का पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
तर याचवेळी मुंबई सह कोकणातील इतर भागांमध्ये देखील उन्हाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागामध्ये पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच सांगली मध्ये तापमान दोन अंशाने घटले तर येत्या काही दिवसांमध्ये हे तापमान 38°c पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सोलापूर मध्ये तापमान सध्या 37°c आहे. तर किमान तापमान 18 अंश असण्याचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये देखील तापमान वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!
नागरिकांसाठी सावधगिरीचे इशारे
मार्च महिन्यामध्ये उष्णतेचा प्रभाव आणखी वाढणार असल्याने नागरिकांना विशेष काळजी घेण्याची आव्हान शासनाने केलेले आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. आणि पुरेसे पाणी प्यावं हलक्या कपड्यांचे परिधान करा. लहान मुलांची काळजी घ्या.
2 thoughts on “महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठा अंदाज; राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या”