Maharashtra Weather Forecast: भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, 24 ते 48 तासांमध्ये देशभरातील विविध ठिकाणी हवामानात बदल झालेला आहे. पंजाब दिल्ली हरियाणा, उत्तर प्रदेश झारखंड बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये सोसाट्याचा वारांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तर या वाऱ्यांमुळे शेती क्षेत्राला काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तनात येत आहे. Maharashtra Weather Forecast
याच दरम्यान, हिमालयीन प्रदेशात नवीन पश्चिम झंझावात (westren Disturbance) मुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बर्फ वृष्टी तर मध्य भारतात तीस ते पस्तीस किमी प्रति तास वेगाने वाऱ्या वाहण्याची शक्यता आहे. या भागामध्ये तापमानात काही प्रमाणात बदल जाणवेल.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज
महाराष्ट्र मध्ये उन्हाचा तडाका – तापमानाचा पारा चढला
फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 37 अंश सेल्सिअस च्या पुढे गेलेले असून, राज्यातील सर्वाधिक तापमान सोलापूर येथे नोंदवले गेलेले आहे. हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, राज्यामध्ये उष्णतेचे तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये तापमान 36 अंशांच्या घरात असेल तर उष्णतेची तीव्रता 40 अंशांच्या वर असल्यासारखी जाणवत आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!
पश्चिम महाराष्ट्र मध्ये ही परिस्थिती वेगळी नाही. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यामध्ये उन्हाचा तडाका जाणवत आहे. तर कोकण मुंबई किनारपट्टीवर दमट हवामान आणखी तीव्र होणार आहे, यामुळे येता काळी दिवसांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अचानक ढगाळ हवामान का दिसते?
हवामानामध्ये सतत वाढणाऱ्या उन्हासोबत काही ठिकाणी अचानक अवकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदलासाठी बाष्पीभवन (Evaporation ) प्रक्रिया कारणीभूत आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. यामुळे महाराष्ट्रात उष्णतेपासून तातडीने मुक्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेट साठी आमच्या सोबत रहा आणि आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा जेणेकरून करून तुम्हाला तुमच्या भागातील हवामान विषयी माहिती मिळेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.