Maharashtra Alert : IMD चा आणखी एक इशारा; राज्यात उष्णतेचा कहर! वाचा सविस्तर माहिती


Maharashtra Weather Alert : राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी उष्णते च्या लाटेचा इशारा दिलेला आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा मध्ये 35 ते 39 अंश असेल दरम्यान तापमान आहे. तसेच विदर्भामध्ये रखरख प्रचंड वाढली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये 36 अंश अधिक तापमानाचे नोंद होत आहे. तर दोन दिवसांमध्ये तापमानात फारसा बदल नसला तरी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये दोन ते तीन अंशाने तापमान वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेची धग वाढणार असल्याचे सांगितले आहे. Maharashtra Weather Alert

सकाळपर्यंत 24 तासात राज्यात उन्हाचां तडाका वाढला असून. सोलापूर नंतर चंद्रपूर येथे 36 अंश सेल्सिअस तापमानाचे नोंद करण्यात आलेले आहे. तर विदर्भातील अकोला ब्रह्मपुरी येथे 38 अंश सेल्सिअस तापमान नोंद करण्यात आलेले आहे. तसेच कोल्हापूर, अमरावती, भंडारा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा येथे तापमानात 37 अंश पुढे पोहोचला आहे.

तसेच पुण्यासह मध्य महाराष्ट्रात देखील प्रचंड शुष्क आणि कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढ झालेली आहे. पुण्यामध्ये बुधवारी 36.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तर सातारा, कोल्हापूर या ठिकाणी 37°c तापमानात नोंद करण्यात आलेली आहे. तसेच नगर, नाशिक, सोलापूर या ठिकाणी 39 अंश तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये एक दोन दिवस आणखी तापमान वाढणार आहे. यामुळे नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे असे भारतीय हवामान खात्याने सांगितलेले आहे.

हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा

मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास मराठवाड्यात देखील तापमान वाढ झालेली आहे. परभणी मध्ये 38 छत्रपती संभाजीनगर मध्ये 35 अंश बीडमध्ये 37.6 अंश तर धाराशिव मध्ये 36.6 अंशावर आपण पोहोचले आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये तापमान हळूहळू दोन ते तीन अंश ने गट होऊन त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात सध्या तापमान प्रमाणावर वाढलेले आहे. चंद्रपूर 39 अंश तर भंडारा 37 गडचिरोली 37, अकोला 38.5, अमरावती 37

अशाच हवामान विषयक अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा!

Leave a Comment

error: Content is protected !!