महाराष्ट्रातील या तारखेला शाळांना सुट्टी?


Maharashtra School | राज्यातील पालकांना आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. येत्या 8 आणि नाव जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक शाळांना दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक नाही, तर यामागे शिक्षकांच्या आंदोलन हे मोठे कारण आहे. Maharashtra School

कशामुळे शाळा बंद?

राज्य सरकारचे विरोधात अनेक शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलन या मागचे मुख्य कारण आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि इतर शिक्षक संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आंदोलन हे आंदोलन आदित्यवर होणार आहे.

राज्यातील अनुदानित आणि अशांत अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या जुन्या मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मूडमध्ये आहेत. आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आजाद मैदानात आंदोलन करणार आहे. त्यामुळे त्या दिवशी बहुतांश शाळा बंद राहणार असणार आहेत असे समजत आहे.

मागच्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये शिक्षकांनी 75 दिवस सलग आंदोलन केलं होतं त्यामध्ये अनुदानित मंजुरी सह इतर आर्थिक मागणी ठेवण्यात आल्या होत्या. सरकारने 10 ऑक्टोबर 2024 ला त्या मागण्या मंजूर केल्या होत्या, पण प्रत्यक्षात निधी तरतूद केलीच गेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनाचा आरोप आहे की, फक्त घोषणा आणि बैठका झाल्या, पण जमीन स्तरावर काहीच झालं नाही.

या पार्श्वभूमी वरती राज्यातील अनुदानित, अशांत अनुदानित आणि काही खाजगी शाळाही आठ व नऊ जुलै रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी असल्याने जास्तीत जास्त शाळांवर याचा परिणाम होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आपापल्या शाळांशी संपर्क साधून आठ व नऊ जुलै रोजी सुट्टी आहे का याची खात्री करून घ्या ही सरकारी रजा नाही, पण शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहतील अशी शक्यता आहे.

हे पण वाचा |  तब्बल 205 परीक्षा केंद्र वरील शिक्षकांची होणार अदलाबदली! पहा जिल्हयानुसार परीक्षा केंद्राची यादी 

Leave a Comment

error: Content is protected !!