महाराष्ट्र महसूल विभाग भरती 2025: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! महसूल विभागात मोठी भरती त्वरित अर्ज करा

महाराष्ट्र महसूल विभाग भरती 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. महाराष्ट्र महसूल विभागांमध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या भरती प्रक्रिया मध्ये कोणते पदे भरली जाणार, वयोमर्यादा, पात्रता अर्ज करण्याची तारीख गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र महसूल विभाग भरती 2025

महाराष्ट्र महसूल विभागअंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल अन्यायधीकरणाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेले उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

(नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रियेची जाहिरात वाचा व या भरतीबाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)

भरती बाबत महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र शासन अंतर्गत महसूल विभागामध्ये अध्यक्ष, सदस्य, या पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. ही भरती प्रक्रिया बृहन्मुंबई(मुख्य खंडपीठ), पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये केली जाणार आहे.

अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
  • तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2025 (उमेदवारांनी तारखेपूर्वी अर्ज करावा)

रिक्त पदांचा तपशील:

1 ) बृहन्मुंबई खंडपीठ

  • अध्यक्ष – (संभाव्य रिक्त)
  • सदस्य ( न्यायिक ) -रिक्त
  • सदस्य ( प्रशासकीय ) – रिक्त

2) पुणे खंडपीठ

  • सदस्य ( न्यायिक) रिक्त
  • सदस्य ( प्रशासकीय ) संभाव्य रिक्त पद

3) छत्रपती संभाजीनगर खंडपीठ

  • सदस्य (न्यायिक) – संभाव्य रिक्त
  • सदस्य ( प्रशासकीय ) रिक्त

4 ) नागपूर खंडपीठ

  • सदस्य ( न्यायिक) – रिक्त
  • सदस्य ( प्रशासकीय ) – संभाव्य रिक्त

निवड प्रक्रिया: निवड प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, 2028 नुसार केली जाणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी या नियमानुसार असणार आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही भरतीची जाहिरात वाचू शकता.

हे पण वाचा | Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

वेतनश्रेणी आणि भत्ते:

निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार वेतन आणि इतर भत्ते देण्यात येणार आहे. त्या संबंधित अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय वाचावा

  • एमआरटी १००७/प्र.क्र.८९/टी-१, दि. ०१/०२/२००८
  • एमआरटी १००७/प्र.क्र.८९/टी-१, दि. १७/०३/२०१२
  • एमआरटी २०१३/प्र.क्र.२३६/टी-१, दि. ३०/०३/२०१६

अर्ज करण्याची पद्धत :

या पद भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन किंवा ईमेलद्वारे सादर करता येणार आहे. अर्ज बंद लिफाफ्यात पाठवावा व त्यावरती महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण अध्यक्ष/ सदस्य न्यायिक, / प्रशासकीय या पदासाठी अर्ज असे नमूद करावे. माझ्यासोबत तुमची आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता

  • उपसचिव, कार्यासन ज-१ अ, महसुल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई -400 032

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रे व्यवस्थित प्रकारे तपासायचे आहेत त्यानंतर अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेमध्ये अर्ज करून संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र महसूल विभागामध्ये नोकरी करण्याचे सुवर्ण संधी वाया जाऊन देऊ नका!

Leave a Comment

error: Content is protected !!