Maharashtra Rain Update: आज महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजचा दिवस अनेक जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क आणि सावधान राहणे आवश्यक आहे.
हे पण वाचा| महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज आणि हवामान विभागाचा इशारा
कोकणात मान्सूनचे दमदार आगमन
मागील काही दिवसापासून विश्रांतीवर असलेला मान्सून आता कोकणात पूर्ण ताकतीने दाखल झाला आहे. रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे. कारण या भागात पर्जन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय संपूर्ण कोकण विभागासाठी येलो अलर्ट देण्यात आले असून तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईकरांनी ही आज छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावे कारण शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राची जीवनरेखा असलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गाठ माथ्यावरील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकाचवेळी मिळणार? महिलांच्या खात्यात जमा होणार डबल हप्ता?
या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट
मराठवाड्यानंतर आता विदर्भात देखील मान्सून ने दमदार एन्ट्री केली आहे. नागपूर अमरावतीसह विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधान व सतर्क रहाणे गरजेचे आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे कारण यामुळे पेरणी झालेल्या पिकाला मोठा फायदा मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे पण वाचा| वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात प्रथमच पुढील पाच वर्षासाठी वीजदर कमी होणार
या भागातील शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनामुळे समाधान व्यक्त केले आहे. मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर सह विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यांना वर्तवली आहे. हा पाऊस मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसापासून या भागात पावसाची कमतरता जाणवत होती पेरणीसाठी हा पाऊस अनुकूल ठरू शकतो.
एकंदरीत सांगायचं झालं तर आज महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे कोकणातील जिल्हे आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. Maharashtra Rain Update
हे पण वाचा| बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून मिळणार विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज..
हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये धोक्याचा प्रवास टाळावा नदी नाल्या याच्या जवळ जाणे टाळावे. शेतकऱ्यांनीही पेरणीपूर्वी तयारी करताना हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. हा मान्सून महाराष्ट्रातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न दूर करू शकतो पुढील काही दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाकडे लक्ष ठेवून आपण आपल्या कामाचे नियोजन करावे.
1 thought on “आज पासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; या 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी! जाणून घ्या हवामान अंदाज”