महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट.. | Maharashtra Rain Alert


Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्यात मान्सून ने एन्ट्री केली असून, हवामान खात्याने 30 जून रोजी मान्सूनच्या स्थितीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे पुणे शहर आणि आसपासच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याचा पुढील पाच दिवसाचा अंदाज

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीमुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड छत्रपती संभाजी नगर परभणी नांदेड कोल्हापूर सांगली जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आले आहे. या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने संबंधित जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा | LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…

पुण्यात जोरदार पावसाचे आगमन

केल्या काही दिवसापासून पुण्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. अधून मधून हलक्या सरी बरसत आहेत तर आठवड्याच्या शेवटी पुणे शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर आजूबाजूच्या घाटमात्यावरील परिसरात जोरदार पाऊस कोसळला आहे. मागील 24 तासाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेला पाऊस या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता आहे. अधून मधून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या इतर भागात पावसाची हजेरी

राज्याच्या इतर भागांमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामध्ये कोल्हापूर नाशिक नंदुरबार पालघर रायगड ठाणे आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांना मान्सूनचा चांगला अनुभव होत आहे. मात्र दरम्यान मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यातील काही भाग अजूनही कोरडाच राहिला आहे. Maharashtra Rain Alert

देशभरात मान्सूनची स्थिती

फक्त महाराष्ट्रातच नाही तर नैऋत्य मानसूनने देशभरात आपली आगेकूच कायम ठेवली आहे. देशाच्या इतर राज्यातही जोरदार पाऊस सुरू असून हा पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे त्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात मार्गी लागेल अशी आशा आहे. याबद्दल त्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनेकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार पुढील नियोजन करावे. मान्सूनच्या सक्रिय मुळे आगामी काळात महाराष्ट्रातील शेती आणि पाणीटंचाईमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट.. | Maharashtra Rain Alert”

Leave a Comment

error: Content is protected !!