Maharashtra Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार झाल असून सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD Weather Alert) दिलेला आहे. यामध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भ या विभागातील जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशार दिलेला आहे. नवीन हवामान अंदाज काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Maharashtra Rain Alert

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. रात्रभर पाऊस पडल्याने गावांमध्ये शेता मध्ये पाणी शिरले असून पहाटेपासून थोडीशी विश्रांती पाहायला मिळाले असली तरी आभाळ अजून भरलेलेच आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
तर विदर्भामध्ये पावसाने जोर धरला असून नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे. विशेष म्हणजे गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे उद्या 24 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजे त्या भागात आणखी अधिक पावसाची शक्यता आहे.
पुढील काही दिवस कसे राहणार वातावरण
23 जुलै रोजी म्हणजे आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, आणि मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट
तसेच 24 जुलै रोजी, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पुणे, सातारा कोल्हापूर घाटमाथा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर मुंबई, पालघर, नाशिक, वशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे.
तसेच 25 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर मुंबई, ठाणे, संपूर्ण विदर्भ, हिंगोली नांदेड या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे.
(अशाच अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला)
हे पण वाचा| Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!