Maharashtra Rain Alert : राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट! नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज


Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा थैमान घातला आहे. यंदा मान्सून वेळेपेक्षा बारा दिवस आधी दाखल झाला आणि त्याचबरोबर अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चांगली धावपळ झाली आहे. अचानक कुठेही मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी पाठेपासूनच मुंबई सह कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाची तीव्रता अधिकच वाढली आहे. Maharashtra Rain Alert

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील परिस्थिती पाहता, हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर आत्तापर्यंत चार नागरिकांचा पावसामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, पुणे जिल्ह्यातील तीन विरार मध्ये एक व्यक्तीचा जीव गेलेला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट!

Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert

हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट दिलेला आहे. जे नागरिक पावसामध्ये फिरायला वगैरे जातात त्यांनी देखील हवामान अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे. या ठिकाणी डोंगर दरी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तर रायगड, पुण्याचा घाट माथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या भागात देखील सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर यानंतर मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. मुंबईमध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरू असून, विभागात वाहतूक विस्कळीत झालेली आहे.

सतर्क रहा

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावलेले आहे नाशिक जिल्ह्यात येवला शहरात वादळी वाऱ्यांचं पावसाने हजेरी लावलेले आहे. दिवसभर दमट वातावरण नंतर पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कांद्याचे पीक शेतात साठवलेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे. आधीच बाजारात भाव मिळाला आणि अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे.

या पार्श्वभूमी वरती राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, विशेषता घाटमाथा आणि पुराच्या प्रवण भागांमध्ये NDRF च्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नद्या नाल्यांजवळ न जाण्याचा अहवाल प्रशासनाने केला आहे. पुढचे काही दिवस हवामान विभागाने पावसाचा इशारा कायम ठेवला आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

हे पण वाचा | Rain Alert : राज्यात होणार मुसळधार! या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याचा मोठा इशारा!

Leave a Comment

error: Content is protected !!