फडवणीस सरकारची मोठी घोषणा! या भागातून होणार नवीन एक्सप्रेस वे! वाचा सविस्तर माहिती

Maharashtra New Expressway : एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारे आहे, ती म्हणजे महाराष्ट्राला एक नवीन एक्सप्रेस वे मिळणार आहे. फडणवीस सरकारने मोठा निर्णय केलेला आहे परंतु हा मार्ग कसा असणार हे आपण पाहणार आहोत. Maharashtra New Expressway

सध्या महाराष्ट्रात विकासाचा नवीन चक्र वेगाने फिरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक मोठी आणि दिलासा देणारी घोषणा केली आहे. ज्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ- मराठवाडा – मुंबई हे अंतरात तासात पार करता येतं, त्याच महामार्गाचा आता आणखी विस्तार होणार असून महाराष्ट्राला नव्याने एक जबरदस्त एक्सप्रेस वे मिळणार आहे. विशेष म्हणजे हा नवीन रस्ता थेट वाढवण बंदराशी जोडला जाणारा असून याचा थेट फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक

विकासाच्या रस्त्याचे नवीन चालना

गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत वेळेत पोहोचत नव्हता, दरम्यान तो सडतो, त्यावर खर्च वाढतो आणि भाव कमी मिळतो. हे चित्रपट बदलण्यासाठी सरकारने कंबर कसलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण करताना स्पष्ट सांगितले की, “या महामार्गाचा पुढचा टप्पा वाढवण बंदराशी नेला जाणार आहे .”

सध्या समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई असा आहे, पण भविष्यात हा महामार्ग इगतपुरी पासून चारोटी मार्गे थेट पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. हा नवा महामार्ग जवळपास 123.4 किलोमिटर लांबीचा राहणारा सून यामुळे इगतपुरी पासून वाढवन बंदरापर्यंतचा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

या नव्या महामार्गामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी थेट फायदा घेऊ शकणार आहेत. शेतमाल, फळबागांचा माल, कृषी प्रक्रिया आणि उद्योगांचा माल थेट वाढवण बंदराशी पोहोचता येणार असून यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ दोन्हीची मोठी बचत होणार आहे. शिवाय बंदरा वाटे परदेशी निर्यतीचे दरवाजेही खुलणार आहेत.

हे सगळे ऐकून तुम्हाला वाटेल, खरंच हे शक्य आहे का? पण हो राज्य रस्ते विकास महामंडळाने यावर काम सुरू केला आहे. चारोटी इगतपुरी दूतगती महामार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरवला जाणार आहे. जमिनीचे अधिग्रहण, आराखडे तयार झाले असून लवकरच काम सुरू होणार आहे.

JNPT बंदरानंतर आता वाढवण बंदर देखील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाची जोडणे म्हणजे राज्यातील प्रत्येक भागाला समृद्धी महामार्गाने देश-विदेशात पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होण. याचा अर्थ केवळ शेतकरीच नाही तर उद्योजक, निर्यात दार, वापर करणाऱ्या आणि सामान्य प्रवासी सगळ्यांना महामार्गाचा फायदा होणार आहे.

विकासाच्या गंगेला आता महाराष्ट्राचा बहर

हे सगळं फक्त रस्ते किंवा वाहतुकीपुरते मर्यादात नाही, तर हा महामार्ग म्हणजे राज्याच्या एकात्मिक विचारांचं गमक आहे. पूर्वीचे भाग विकासापासून दूर होते, ते आता मुख्य प्रवासात येणार आहेत. शेतकऱ्यांना नवं संजीवनी उद्योगांना नवे मार्ग आणि तरुणांना रोजगाराचे नव दालन खुल होणार आहे.

Read this too | एसटी प्रवासांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील या शहरात होणार नवीन बस स्थानक

Leave a Comment

error: Content is protected !!