Maharashtra IMD Update : शेतकऱ्यांनो, IMD चा हवामान अंदाज पाहिला का? तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे. राज्याच्या हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना नक्कीच बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर IMD ने छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, जालना, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधवांनी हा सविस्तर हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. Maharashtra IMD Update
खर तर गेला काही दिवसापासून स्वराज्याच्या वातावरणामध्ये सातत्याने बदलत आहे आणि हा वातावरण बदलाचा फटका नागरिकांसह शेती पिकांना देखील सहन करावा लागत आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता सातत्याने वाढत आहे. या उष्णतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेले आहेत. दिवसा कडक उष्णता तर रात्री पहाटेच्या सुमारास हवेत गारवा आणि आता मुसळधार पावसाचा इशारा यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये आलेला आहे. याचा परिणाम थेट संत्री, काजू, आंबा, द्राक्ष यासारख्या शेती फळबागांवर होत असलेले शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसान होत आहे. तसेच सर्वसामान्यांना या हवामान बदलाचा मोठा त्रास होत असल्याचा समोर आलेला आहे.
राज्याच्या हवामानामध्ये बदल होण्याचे मोठे कारण म्हणजे, दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. याचे रूपांतर चक्रीवादळ मध्ये तयार होण्याची शक्यता आहे याचा फटका दक्षिणेतील राज्यांना बसणार आहे. कर्नाटक येथे मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तर महाराष्ट्र मध्ये हे चक्रीवादळ धडकलं नसलं तरी याचा परिणाम राज्यावरती होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यामध्ये उष्णता व आता मुसळधार पाऊस यामुळे दुहेरी संकट निर्माण झालेले आहे. कधी सोसाट्याचा वारा, तर विजांच्या कडकडाट आणि हवेत गारवा तर वाढती उष्णता, आणि पहाटे गारवा निर्माण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा नागरिकांना देखील याचा फटका बसत आहे.
याच पार्श्वभूमी वरती काही तज्ञांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीमध्ये जर अवकाळी पाऊस आला तर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. व याचा थेट परिणाम शेती वर होणारच आहे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनावरती देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन करून त्यांचे नुकसान होण्यापासून बचाव करायचा आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राचा हा हवामान बदल एक मोठा अपडेट दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा आठ जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे. तर दुसरीकडे दिवसात तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस पोहोचत आहे. भारतीय हवामान खात्याने कोणत्या 29 आणि 30 मार्च दरम्यान, राज्यात पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. खास करून छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड या ठिकाणी शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
( व अशाच हवामाना अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून लवकरात लवकर माहिती मिळेल.)