Maharashtra Budget 2025 : राज्य शासनाने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी 2024 मध्ये अर्थसंकल्पनात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती प्रति महिना दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती प्रचारादरम्यान सरकारने ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता निवडणुकीला तीन महिने उठले असताना या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांचे लक्ष येता एक मार्च 2025 रोजी सादर होणारा अर्थसंकल्पना कडे लागलेले आहे. Maharashtra Budget 2025
₹2100 रुपयांच्या घोषणेची शक्यता
सध्या एक मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2100 रुपये घोषणा करू शकतात. अशी शक्यता प्रसार माध्यमांमध्ये व्यक्त केली जात आहे. महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी याआधी अर्थसंकल्पानंतर महिलांना ₹2100 रुपये मिळू शकतात असे संकेत दिले होते. मात्र अद्याप महिला व बालविकास विभागाने या संदर्भात अधिकृत प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलेले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र
पाच लाख महिलांना अपात्र ठरवले.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना सरकारने पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. कोणत्या महिला आहेत ते खालील प्रकारे जाणून घ्या.
- राज्य शासनाने ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेता येत अशा 2.30 लाख महिलांना अपात्र ठरवले.
- 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला -1.10 लाख महिलांना अपात्र ठरवले.
- कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असलेल्या महिला
- नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले.
- स्वतःच्या इच्छेने या योजनेतून माघार घेतलेली महिलांची संख्या 1.60 लाख इतकी आहे.
अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार का?
सध्या समाज माध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसार होत लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाल्या असल्यामुळे या योजनेमध्ये ज्या महिला अपात्र ठरणार आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, महिला व बालविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या महिला पात्र ठरणार आहे. त्यांच्याकडून सरकार कोणतेही रक्कम परत घेणार नाही. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान जमा झालेली सन्मान निधी रक्कम महिलांच्या खात्यातच राहील. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार, आधी दिलेली आर्थिक मदतीची वसुली करणे योग्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे.
महिलांचे लक्ष अर्थसंकल्पनाकडे
लाडकी बहीण योजनेतील रक्कम ₹1500 वरून ₹2100 रुपये करण्याची घोषणा होईल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. राज्याचा अर्थसंकल्प 1 मार्च 2025 रोजी जाहीर होणार आहे त्यात यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.